शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ, मराठवाड्यातील साखर कारखाने संकटात

By admin | Updated: December 4, 2015 02:07 IST

हमखास पैसे मिळणारे पीक म्हणून उसाची गोडी राज्यभरातील शेतकऱ्यांना लागली खरी परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा विदर्भ, मराठवाडा व खान्देशातील साखर कारखानदारी

- अरुण बारसकर,  सोलापूरहमखास पैसे मिळणारे पीक म्हणून उसाची गोडी राज्यभरातील शेतकऱ्यांना लागली खरी परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा विदर्भ, मराठवाडा व खान्देशातील साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. या पट्ट्यातील तब्बल ७० कारखाने यंदा बंद तर ५५ कारखाने कसेबसे सुरू आहेत. दुष्काळाची झळ पश्चिम महाराष्ट्रालाही बसली असून या पट्ट्यातील १७ कारखाने बंद ठेवावे लागले आहेत.मागील दोन वर्षांपासून राज्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. १९९० च्या दशकापर्यंत पश्चिम महाराष्ट्राची मक्तेदारी असलेल्या साखर कारखानदारीने विदर्भ, मराठवाडा व खान्देशातही पाय पसरण्यास सुरुवात केली. मागील वर्षापर्यंत या पट्ट्यातील १९ जिल्ह्णात तब्बल १२५ साखर कारखाने आहेत. यापैकी अहमदनगर, नाशिक, उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, जालना या जिल्ह्णात अधिक कारखाने आहेत, परंतु मागील दोन वर्षांत पाऊसमान वरचेवर कमी होत असल्याने कारखान्यांना ऊस मिळेनासा झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही १६ कारखाने यावर्षी उसाअभावी बंद आहेत. यामध्ये सोलापूर व सांगलीचे प्रत्येकी चार, कोल्हापूर व साताऱ्याचे प्रत्येकी तीन व पुण्याच्या दोन साखर कारखान्यांचा समावेश आहे. यामुळे साखर हंगामावर कमालीचा परिणाम होणार असल्याचे सांगण्यात आले. यंदा ७६० लाख मेट्रिक टनावरच हंगाम आटोपणार असा साखर आयुक्त कार्यालयाचा अंदाज आहे. बंद कारखाने : औरंगाबाद ५, जालना २, बीड ५, परभणी ४, नांदेड ६, उस्मानाबाद १६ यावर्षी १२५ पैकी ५५ कारखान्यांची धुराडी पेटली असून ७० कारखाने सुरू झाले नाहीतपश्चिम महाराष्ट्रातील १०६ साखर कारखान्यांपैकी मागील वर्षी अवघे ७ कारखाने बंद होते यावर्षी १६ कारखाने बंद आहेत.अहमदनगरचे २२ पैकी ४, नाशिकचे ९ पैकी सहा, औरंगाबादचे ९ पैकी ५, जालन्याचे पाचपैकी २, बीडचे १० पैकी ५, परभणीचे ५ पैकी चार, नांदेडचे ८ पैकी ६, उस्मानाबादचे १६ पैकी १२, लातूरचे १२ पैकी ८, यवतमाळचे ४ पैकी ३ साखर कारखाने बंद आहेत.वर्ध्याच्या दोन पैकी एक, भंडाऱ्याच्या दोन पैकी एक, अमरावतीचा एकमेव विदर्भ शुगर, बुलढाण्याचे तीन, जळगावचे ७, नंदूरबारचे तीन, धुळ्याचे दोन साखर कारखाने बंद आहेतमागील वर्षी मराठवाडा, खान्देश व विदर्भातील १२५ कारखान्यांपैकी ८१ कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता तर ४४ कारखाने बंद ठेवले होते