शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

साखर निर्यातीचे धोरण हवे

By admin | Updated: January 18, 2016 00:55 IST

शरद पवार : शेती विकासाचे राजकारण करूया; सा. रे. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

शिरोळ : साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी साखर निर्यातीचे धोरण राबविले पाहिजे, त्याशिवाय बाजारभाव सुधारून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दर मिळणार नाही, ही वस्तुस्थिती असल्याचे सांगतानाच शेतीवर परिणाम होणारे राजकारण करू नका, शेती उत्पादन वाढीबरोबर शेतकऱ्यांच्या विकासाला दिशा देणारे राजकारण करूया, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी रविवारी येथे केले.येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक, माजी अध्यक्ष, स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी सा. रे. पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण खा. शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील होते. त्यानंतर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शर्करा औद्योगिक श्रमिक संघाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचे भूमिपूजन, तर सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन माजी वनमंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले. खा. पवार पुढे म्हणाले, देशामध्ये उसाचे सरासरी एकरी उत्पादन २९ टनांचे आहे. यात महाराष्ट्राचे ३४ टन असून, दत्त कारखान्याचे ४३ टन आहे, हे वेगळे वैशिष्ट आहे. कारखान्याने पुरस्कारांचा तर विक्रमच केला आहे. ‘दत्त’मुळे कारखानदारीला दिशास्व. सा. रे. पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत खा. शरद पवार म्हणाले, खऱ्या अर्थाने साखर कारखानदारीला दिशा देण्याचे काम सा. रे. पाटील यांच्या नेतृत्वाखाली दत्त कारखान्याच्या प्रांगणातून झाले आहे. सामान्य माणूस शक्तिशाली बनला पाहिजे, ही भूमिका त्यांची होती. या दूरदृष्टीतूनच दत्त कारखान्याला त्यांनी ऊर्जितावस्था दिली. श्रीवर्धन बायोटेकमधील फूलशेती देशातील आदर्श असून, स्व. सा. रे. पाटील यांच्यानंतर त्यांचे पुत्र गणपतराव पाटील यांनी तोच आदर्श कायमपणे ठेवला आहे.कमी पाण्यावरील उसाचे तंत्रज्ञान आणणारआज साखर कारखानदारीसमोर मोठे प्रश्न उभे आहेत. ब्राझील, इस्रायल, इंडोनेशिया सारख्या देशांतील साखर उत्पादन व ऊसदर यांचा विचार करता आपल्या देशातही आधुनिक तंत्रज्ञान राबविण्याची गरज आहे. केवळ साखर उत्पादन उपयोगाचे नसून, एकरी ऊस उत्पादन वाढले पाहिजे. यासाठी कमी पाण्यामध्ये अधिक उत्पादन देणारे परदेशातील ऊस बियाणांचे आधुनिक तंत्रज्ञान वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमार्फत राबविण्याचा ठोस कार्यक्रम हाती घेतला जाणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.