भिवापूर (जि़ नागपूर) : मुख्याध्यापकास मारहाण केल्याप्रकरणी उमरेडचे आमदार सुधीर पारवे यांना दोषी ठरवत २ वर्षे सश्रम कारावास व २५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ महिने अतिरिक्त साधा कारावास तर, कलम ३५३ अंतर्गत १ वर्ष सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय व लोकप्रतिनिधी कायद्यानुसार त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे.२००५ मध्ये शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिलेचा हात धरल्याच्या कारणावरून मुख्याध्यापक महेंद्र धारगावे यांना पारवेंंनी मारहाण केली होती. धारगावे यांच्या तक्रारीवरून भिवापूर पोलिसांतर्फे पारवे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सुधीर पारवे यांना दोन वर्षांचा कारावास
By admin | Updated: April 25, 2015 09:49 IST