शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सुधीर नाईक यांनी राजीनामा दिला

By admin | Updated: July 1, 2016 05:03 IST

तब्बल तीन दशके मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये काम करणारे अनुभवी पिच क्युरेटर सुधीर नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

मुंबई : तब्बल तीन दशके मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये काम करणारे अनुभवी पिच क्युरेटर सुधीर नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. माजी कसोटीपटू असलेल्या सुधीर यांचा मुंबई क्रिकेट असोसिएशनसह (एमसीए) असलेला दोन वर्षांचा करार ३१ मे ला समाप्त झाला होता. यानंतर त्यांनी संघटनेला पत्र लिहून हा करार न वाढवण्याबाबत सांगितले. गतवर्षी वानखेडे स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पाचव्या व अंतिम सामन्यात टीम इंडियाला दारुण पराभवास सामोरे जावे लागले होते. त्या वेळी खेळपट्टीवर जोरदार टीका करताना तत्कालीन संघ निर्देशक रवी शास्त्री यांनी सुधीर यांच्याशी वाद घातला होता. या वेळी शास्त्री यांनी आपल्याला अपशब्द वापरले, असा आरोप यांनी सुधीर यांनी केला होता. हा वाद चांगलाच रंगला होता. आपल्या राजीनाम्याबद्दल ७१ वर्षीय सुधीर यांनी सांगितले की, ‘‘माझे वय खूप झाले असून या वयामध्ये पिच क्युरेटरची जबाबदारी सांभाळणे माझ्यासाठी कठीण आहे. मी माझ्या कामाचा पुरेपूर आनंद घेतला आहे. मात्र माझ्या मते आता मी अजून काम करू शकणार नाही. याबाबतीत मी एमसीएला पत्राद्वारे पद सोडत असल्याचे कळवले आहे.’’ दरम्यान, याविषयी एमसीएचे संयुक्त सचिव पी. व्ही. शेट्टी यांनी दुजोरा देताना सांगितले की, ‘‘सुधीर यांचे राजीनामापत्र मिळाले असून, लवकरच नव्या पिच क्युरेटरची नियुक्ती करण्यात येईल.’’ यानंतर सुधीर यांचे सहकारी म्हणून काम पाहिलेले महमुनकर यांची एमसीएचे नवे पिच क्युरेटर म्हणून निवडले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (क्रीडा प्रतिनिधी) >पिच क्युरेटर : तीन दशकांचा प्रदीर्घ अनुभव