शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

स्टिंग ऑपरेशनद्वारे व्यथा मांडणा-या बेपत्ता जवानाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

By admin | Updated: March 3, 2017 13:27 IST

वरिष्ठ अधिका-यांचा सहाय्यक म्हणून काम करावे लागत असल्याचे सांगत जवानांची व्यथा मांडणा-या नाशिकमधील बेपत्ता जवानाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

ऑनलाइन लोकमत
देवळाली (नाशिक), दि. ३ - नाशिकमधील देवळाली कॅम्पमधील बेपत्ता जवान रॉय मॅथ्यूचा (वय ३३) मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. रॉय हा २५ फेब्रुवारी पासून बेपत्ता होता, अखेर काल (गुरूवारी) देवळाली कॅन्टॉनमेंटमधील एका खोलीत रॉयचा गळफास घेतलेला, कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. रॉय मॅथ्यूचा तीन दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसानी व्यक्त केला असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. काही दिवसांपूर्वी जवानांची व्यथा मांडणारा एका व्हिडीओ व्हायरला झाला होता, ज्यामध्ये मॅथ्यूही दिसला होता. त्यावरून झालेला वाद आणि मॅथ्यूचा मृत्यू, याचा एकमेकांशी काही संबंध आहे का याचाही शोध घेण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉय मॅथ्यू गेल्या १३ वर्षांपासून लष्करात कार्यरत होता. काही दिवसांपूर्वी देवळाली कॅम्पमधील जवानांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये जवान वरिष्ठांच्या मुलांना शाळेत सोडणे-आणणे, तसेच त्यांची कुत्री फिरवणे अशी सहाय्यकाची कामे करताना दिसत होते. वरिष्ठ अधिका-यांकडून जाच होत असल्याचा आरोपही त्यामध्ये करण्यात आला होता.  या व्हिडीओमुळे मोठा वादही निर्माण झाला. ब्रिटीशांच्या राजवटीतीप्रमाणे जवानांना सहाय्यकाची वागणूक देण्यात येत असल्याची टीकाही लष्करातील अधिका-यांवर करण्यात आली होती. याप्रकरणानंतर इतर जवानांसह मॅथ्यूचीही चौकशी करण्यात येत होती. त्यामुळे तो प्रटंड तणावात होता, असा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. 
मात्र २५ फेब्रुवारीपासून तो अचानक गायब झाला आणि अनेक दिवस त्याचा काहीच पत्ता लागला नाही. मात्र गुरूवारी संध्याकाळी कॅम्पमधील एका निर्जन भागातील खोलीत त्याचा गळफास घेतलेला मृतदेह आढळल्यान एकच  खळबळ उडाली. याप्रकरणी पुढील चौकशी करण्यात येत असून मॅथ्यूचा कोणी छळ केला होता का, (चौकशी प्रकरणामुळे) तो दबावाखाली होता का हेही तपासण्यात येत आहे.