शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांची अशीही टोलेबाजी

By admin | Updated: July 21, 2016 04:39 IST

कोपर्डी प्रकरणावरून विधान परिषदेत उपस्थित झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौफेर फटकेबाजी करत विरोधकांना नामोहरण केले.

मुंबई: कोपर्डी प्रकरणावरून विधान परिषदेत उपस्थित झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौफेर फटकेबाजी करत विरोधकांना नामोहरण केले. काँग्रेसचे नेते नारायण राणे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेल्या आरोपांचा त्यांनी समाचार घेतला.परदेशी कशाला देशीच काफी!मुख्यमंत्री कार्यालयातील सचिव प्रवीण परदेशी हे आपल्याविरोधात बातम्या पेरत असल्याचा आरोप राणे यांनी केला होता. त्याचाही मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, तुमच्या विरोधात बातम्या द्यायला परदेशी कशाला, देशीच काफी आहेत. तुमच्या पक्षातील कोणाबद्दल तुम्ही चांगलं बोलता का? तुमच्याच पक्षातील लोक तुमच्या विरोधात बातम्या पेरत असतात, असा थेट हल्ला मुख्यमंत्र्यांनी केला.म्हणून पिडीत कुटुंबाची भेट घेतली नाहीपॉस्को कायद्याअंतर्गत गुन्ह्याचा तपास चालू आहे. त्यामुळे पीडित व्यक्तीच्या घरी जाता येत नाही. भेट दिल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कुटुंबियांची अन्यत्र भेट घ्या किंवा आरोपपत्र निश्चित झाल्यानंतर भेटा, असा सल्ला पोलिसांनी दिला. त्यामुळे मी अजून कोपर्डीला गेलेलो नाही, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला. तर मंत्री पदावर राहणार नाहीराज्य सरकारमधील एखादा मंत्री गुन्हेगार सापडला तर एक मिनिटही तो पदावर राहणार नाही. मात्र साप म्हणून भुई थोपटत असाल, तर एकही मंत्री राजीनामा देणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी निक्षून सांगितले. महिला अधिका-याचा विनयभंग करणा-या मंत्र्यांबाबत राणे यांनी आरोप करण्यापेक्षा त्याबाबतची माहिती दिली पाहिजे. असे मुद्दे विधान परिषदेत राजकारण करण्यासाठी वापरायचे नसतात, असाही टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला.विरोधी पक्षाची अवस्था बोफोर्स तोफांसारखीराज्य सरकारवर बेछूट आरोप करणाऱ्या विरोधी पक्षाची अवस्था बोफोर्सच्या तोफांसारखी झाली आहे, अशी उपमा यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. या तोफांमध्ये ‘शूट अ‍ॅड स्कूट’ हे तंत्रज्ञान वापरले आहे. त्यात गोळा आपल्या अंगावर येऊ नये म्हणून मारा करायचा आणि जागा बदलायची अशी रचना असते. विरोधी पक्षातल्या नेत्यांनी हीच पद्धत सुरू केली असल्याचा टोला त्यांनी यावेळी हाणला.