शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 1st T20I : पांड्याची 'फिफ्टी' अन् बुमराहची 'सेंच्युरी'; टीम इंडियासमोर द.आफ्रिकेच्या संघानं टेकले गुडघे
2
“संविधान सोप्या भाषेत समजावून सांगणारा देशात दुसरा CM नाही”; शिंदेंनी केले फडणवीसांचे कौतुक
3
IND vs SA T20I : कटकच्या मैदानात हार्दिक पांड्याची कडक खेळी; सिक्सरच्या 'सेंच्युरी'सह साजरी केली 'फिफ्टी'
4
IndiGoच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार, सरकारसोबतच्या बैठकीत CEO हात जोडताना दिसले...
5
२६.६६ कोटींचा गंडा! बनावट स्टॉक स्कीमच्या जाळ्यात फसला व्यापारी; बँक कर्मचाऱ्यासह ७ जण अटकेत
6
हात फॅक्चर असताना ते मैदानात उतरले अन्...! शतकाच्या बादशहानं शेअर केली दिग्गजासोबतच्या शतकाची गोष्ट
7
स्मृती मानधनाच नव्हे, तर 'या' खास ९ लोकांनीही पलाश मुच्छालला केलं 'अनफॉलो', पाहा यादी
8
"इंदिरा गांधी यांनी मतचोरी करूनच रायबरेली जिंकली..."; भाजपा खासदाराचे राहुल गांधींना उत्तर
9
अनंत अंबानी यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान! मिळाला प्रतिष्ठेचा 'ग्लोबल ह्यूमॅनिटेरियन' पुरस्कार
10
“उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे मला बाहेर काढले, ‘त्या’ भाजपा नेत्याला माफी नाही”: किरीट सोमय्या
11
Numerology: त्रिग्रही लक्ष्मी नारायण योग, ६ मूलांकांना दुपटीने लाभ; पद-पैसा-नफा, चांगला काळ!
12
राज्यात थंडीचा कडाका वाढला! अहिल्यानगरमध्ये ७. ४ सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद
13
"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं
14
IND vs SL WT20I :भारतीय संघाची घोषणा; स्मृती मानधना खेळणार; 'या' दोघींना मिळालं मोठं सरप्राइज
15
RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...
16
“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित
17
"भाजप काय करतंय हे त्यांनी जगाला दाखवून दिलं"; सुप्रिया सुळेंनी केलं निलेश राणेंचे कौतुक
18
कला केंद्राच्या प्रेमकथेचा भयावह शेवट; नर्तकीसमोरच पत्नीचा फोन आल्याने वाद, तरुणाने स्वतःला संपवले
19
प्रेरणादायी! वडील गमावल्याचं दुःख पण आईची खंबीर साथ; IAS होऊन पूर्ण केलं कुटुंबाचं मोठं स्वप्न
20
हृदयद्रावक! आंघोळीला गेला, जीव गमावला; गीझर बनला सायलेंट किलर, तरुणासोबत घडलं आक्रित
Daily Top 2Weekly Top 5

...अशी चूक पुन्हा घडू नये - मांडवगणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 06:01 IST

भारतीय वायुसेनेने २६ फेबु्रवारी रोजी पाकव्याप्त काश्मीरच्या भागात घुसून कारवाई (एअर सर्जिकल स्ट्राइक) केली.

- अझहर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : काश्मीरमधील बडगाम येथे २७ फे ब्रुवारी रोजी सकाळी भारतीय वायुदलाच्या लढाऊ एमआय-१७ व्ही-५ हेलिकॉप्टरला अपघात होऊन नाशिकच्या डीजीपीनगरमधील सहवैमानिक स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्यासह सहा जवानांना वीरमरण आले. देशाच्या संरक्षणासाठी निनादने आपले बलिदान दिले आहे. त्याच्या वीरमरणाचा सरकारने उचित सन्मान करावा आणि भारतीय सैन्याने यंत्रणेतील दोष निवारण क रून यापुढे अशी चूक घडणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी भावना निनाद यांचे वडील अनिल मांडवगणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

भारतीय वायुसेनेने २६ फेबु्रवारी रोजी पाकव्याप्त काश्मीरच्या भागात घुसून कारवाई (एअर सर्जिकल स्ट्राइक) केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी जम्मूच्या राजौरी सेक्टरच्या दिशेने घुसखोरीचा प्रयत्न केला. त्याचदिवशी निनाद व त्यांच्या सहकारी जवानांचे लढाऊ हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळले. सुरुवातीला तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याचे वृत्त आले होते; मात्र आता शत्रूचे हेलिकॉप्टर समजून हवाई दलाकडूनच क्षेपणास्त्र या हेलिकॉप्टरच्या दिशेने डागले गेल्याचे चौकशीत पुढे येत आहे. याप्रकरणी एका वरिष्ठ अधिकाºयावर वायुसेनेने कारवाईदेखील केल्याचे समजते.

देशाचा सैनिक सहजासहजी घडत नसतो. स्क्वॉड्रन लीडर या पदावरील अधिकारी घडविण्यासाठी मोठा कालावधी लागतो. त्यासाठी कठोर परिश्रम वायुदलाला घ्यावे लागतात. त्यामुळे निनादच्या रूपाने आमच्या कुटुंबासह देशाचे मोठे नुकसान झाले आहे, अशा प्रतिक्रिया त्यांच्या वडिलांनी व्यक्त केली. निनाद यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले, त्याच्या दुसºया दिवशी वायुसेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घरी पुन्हा भेट देऊन निनाद यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेविषयी माहिती दिली होती, असे मांडवगणे यांनी सांगितले. वायुसेना एक कुटुंबाप्रमाणे असून, मुलगा गमावल्याचे जसे दु:ख आम्हाला आहे, तसे भारतीय वायुसेनेलाही उत्तम वैमानिक गमावल्याचे दु:ख असल्याचे मांडवगणे म्हणाले.यंत्रणेचा समन्वय चुकलायंत्रणेमध्ये योग्य समन्वय घडून आला नाही आणि बॉम्बगोळा डागला गेला, अशी चुकीची पुनरावृत्ती यापुढे कधीही होता कामा नये, जेणेकरून विनाकारण शूरवीरांना वीरमरण येणार नाही, असे मत मांडवगणे यांनी व्यक्त केले. शहीद निनाद व त्यांचे सहकारी दोन मिशन पूर्ण करून तिसºया मिशनवर होते. मात्र याचवेळी यंत्रणेमधील समन्वयाच्या अभावाने त्यांना वीरमरण आले.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दल