शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

विमान तिकिटांची अशीही फसवाफसवी

By admin | Updated: April 26, 2017 02:30 IST

अवघ्या तीन ते चार हजारांत मिळणारे विमान तिकीट १० ते २७ हजार रुपयांत विकून प्रवाशांची फसवणूक करणारे रॅकेट एजंट आणि विमान

मनीषा म्हात्रे / मुंबईअवघ्या तीन ते चार हजारांत मिळणारे विमान तिकीट १० ते २७ हजार रुपयांत विकून प्रवाशांची फसवणूक करणारे रॅकेट एजंट आणि विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरू आहे. मुंबईच्या एका कुटुंबातील ३२ प्रवाशांचे बुकिंग असतानाही ऐनवेळी बोर्डिंगची वेळ चुकल्याचे कारण सांगून एका विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना प्रवासास मज्जाव केला. तसेच जास्तीचे पैसे मागत नवीन तिकिटे काढण्यास सांगितले. या प्रकरणी एजंट सचिन वर्मा व विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरोधात ताडदेव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताडदेवमध्ये राहणारे व्यावसायिक जयंती वीरजी राठोड (४५) यांनी नोव्हेंबर २०१६मध्ये दिवाळीच्या सुटीत कुटुंबीय आणि मित्र मंडळी अशा ३२ जणांनी हरिद्वार, मथुरा आणि आग्रा या ठिकाणी फिरायला जायचे ठरवले. त्यानुसार ४ ते १३ नोव्हेंबर दरम्यान मुंबई ते दिल्ली टे्रनने, त्यानंतर १३ नोव्हेंबरला दिल्ली ते मुंबई हा प्रवास विमानाने करण्याचे ठरले. विमानाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगसाठी त्यांना २ आॅगस्ट रोजी जस्ट डायलवरून काही एजंटची नावे मिळाली. त्यानुसार त्यांनी सचिन वर्माकडून प्रत्येकी ४ हजार ८०० रुपये प्रमाणे ३२ तिकिटे बुक केली. त्यानंतर आणखी ५३०० दराने तीन तिकिटे बुक केली. १९ आॅक्टोबरला त्यांना ३५ तिकिटे आरक्षित झाल्याचे समजले. १३ नोव्हेंबरला परतीच्या प्रवासासाठी दिल्लीचे इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट गाठले. राठोड यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, १०.४५ची फ्लाईट असल्याने त्यांनी सर्वांचे तिकीट घेऊन तेथे बोर्डिंग पास मागितला. त्यांना तेथील सुपरवायझर गौरी यांच्याकडे जाण्यास सांगण्यात आले. तर गौरी यांनी एजंटशी संपर्क साधण्यास सांगितले. त्याचा मोबाइल बंद होता. तोपर्यंत बोर्डिंगची वेळ निघून गेल्याने पास देता येणार नसल्याचे सांगितले. प्रत्येकी २७ हजार ३०० रुपयांचे नवीन तिकीट बुक करावे लागेल, असेही सांगण्यात आले. प्रवाशांनी गोंधळ घातल्यावर १०च्या सुमारास ७ पैकी तिघांना बोर्डिंग पास मिळाला. अखेर राठोड यांनी अन्य एजंटकडून प्रत्येकी १० हजार रुपये देऊन तिकीट बूक केले. या दहा हजारांपैकी विमान कंपनीच्या खात्यात अवघे ३ हजार१५३ रुपये जमा झाल्याची माहिती राठोड यांना नंतर मिळाली. वरिष्ठांच्या दबावापोटी पोलीस या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा राठोड यांचा आरोप आहे. तर ताडदेव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सुर्वे म्हणाले, सचिन वर्मा याला लवकरच अटक करण्यात येईल. त्याच्याकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारावर इतरांवर कारवाई होईल.