शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातील पातूरमध्ये केशर लागवडीचा प्रयोग यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 09:11 IST

डॉ. दिगंबर रमेश क्षीरसागर यांनी विदर्भात केशराची शेती फुलवली आहे. यातून त्यांनी अवघ्या साडेपाच महिन्यात १० लाख ८० हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळवलाय.

संतोष गवई/ऑनलाइन लोकमत

शिर्ला ( अकोला ), दि. 19 -  अमेरिकेतील विषुववृत्तीय प्रदेश आणि काश्मीर खोऱ्यात प्रामुख्याने घेतल्या जाणाऱ्या अमेरिकन केशर पिकांच्या लागवडीचा प्रयोग पातूर परिसरातील कांद्यांच्या पट्ट्यात यशस्वी झाला आहे. पातूर तालुक्यातील विवरा येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉ. दिगंबर रमेश क्षीरसागर यांनी जिद्दीच्या बळावर काश्मिरात नव्हे, विदर्भात केशराची शेती फुलवली आहे. या शेतीतून त्यांनी अवघ्या साडेपाच महिन्यात १० लाख ८० हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे.

डॉ.दिगंबर क्षीरसागर यांच्याजवळ एकूण तीन एकर 20  गुंठे जमीन आहे . या जमिनीवर इतर शेतकऱ्यांप्रमाणे ते सोयाबीन आणि कपाशीची नफ्याबाबत भरवसा नसणारी पिके घेत होते; मात्र त्यांना जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील मोरगाव खुर्द येथील संदेश पाटील यांनी केशर शेती यशस्वी केल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी चार मित्रांना सोबत घेऊन मोरगाव खुर्द येथील संदेश पाटील यांच्या केशर शेतीची पाहणी केली.

त्यांनी संदेश पाटील यांच्याशी चर्चा करून केशर शेतीसाठी लागणारे केशरबीज कुठे मिळते, त्यासाठी खते कोणती, त्या पिकावर येणारे रोग व त्याच्या संरक्षणासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर राजस्थानातून शिखर व काश्मिरातील पामपूर येये जाऊन ९० हजार रुपयांचे केशर बीज घेतले. त्याची पेरणी विवरा येथील एक एकर शेतात केली. त्या पिकाची योग्य प्रकार काळजी घेऊन वाढविले. त्यानंतर अवघ्या साडेपाच महिन्यात २७ किलो केशराचे भरघोस उत्पादन घेतले. सध्या केशराची किमत बाजारपेठेत १0 लाख ८0 हजार रुपये आहे. जिद्दीपोटी केशर शेतीकडे वळलो!सोयाबीन व कापसाची पारंपरिक पिके घेऊन समाधानकारक उत्पन्न आणि भाव मिळत नाही, हे समजल्याने पीक पद्धतीत प्रयोग करण्याची जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती. पहिल्याच प्रयोगात अमेरिकेत व काश्मीरसारख्या प्रदेशात येणाऱ्या केशर पिकाच्या लागवडीचा प्रयोग विदर्भात यशस्वी केला, अशी प्रतिक्रिया प्रयोगशील शेतकरी डॉ. डिगांबर क्षीरसागर यांनी व्यक्त केली.

राजस्थान व काश्मिरातून आणले केशरबीजडॉ. क्षीरसागर यांनी विवराच्या स्वत:च्या मालकीच्या एक एकर क्षेत्रावर अमेरिकन केशराची लागवड करण्याकरिता बियाणे खरेदीसाठी काश्मीरचे पामपूर तर राजस्थानचे शिखर गाठले. तेथून ९० हजार रुपयांचे केशर बीज खरेदी करून त्याची शेतात लागवड केली.