शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मूकनाट्यात एसएनडीटी विद्यापीठाचे यश

By admin | Updated: February 27, 2017 01:28 IST

चर्चगेट येथील एसएनडीटी महिला विद्यापाठाने मूकनाट्य स्पर्धेत यश मिळवले. विद्यापीठाने पश्चिम विभागात पहिला क्रमांक पटकावला

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवात चर्चगेट येथील एसएनडीटी महिला विद्यापाठाने मूकनाट्य स्पर्धेत यश मिळवले. विद्यापीठाने पश्चिम विभागात पहिला क्रमांक पटकावला, तर कोल्हापूर येथे झालेल्या राष्ट्रीय महोत्सवात दुसरा क्रमांक मिळवला. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाने ३२ व्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन केले होते. महोत्सवात एसएनडीटी महिला विद्यापीठ संघातील ऋतुजा मारणे, अरुणा पवार, प्राची कोरपड, दीपाली बिर्जे, वर्षा डोईफोडे आणि माधवी भोसले यांनी दर्जेदार मुकाभिनय करून उपस्थितांची मने जिंकली. कृणाल पाटील आणि विनायक सैद यांनी या मूकनाट्याचे दिग्दर्शन केले होते़ कल्पना, सादरीकरणातील नावीन्यपूर्णता, मेकअप, संगीत आणि एकूण सादरीकरण या सर्व निवड निकषांवर एसएनडीटी संघाने छाप पाडली. पश्चिम विभागात एसएनडीटी संघाने अव्वल क्रमांक पटकावला होता, तर राष्ट्रीय स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. कोणत्याही संवादाशिवाय प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवणे आणि त्यांना योग्य संदेश देणे हे जिकरीचे काम होते. स्पर्धेत १५ संघांमधून दुसरा क्रमांक मिळवल्याने मी समाधानी आहे. आगामी युवा महोत्सवात पुन्हा जोमाने तयारी करून, विजेतेपदाला गवसणी घालण्याचा विश्वास दिग्दर्शक कृणाल पाटीलने व्यक्त केला. (प्रतिनिधी)मूकनाट्य स्पर्धेत विभागीय स्पर्धेतून पहिली तीन मूकनाट्ये पात्र ठरली होती. अशा पाच झोनमधून प्रत्येकी तीन महाविद्यालये स्पर्धेत होती. तेथे विविध स्पर्धकांनी वैविध्यपूर्ण विषयांची मांडणी केली होती. त्यामुळे राष्ट्रीय स्पर्धेत काही गुणांच्या फरकाने निकाल अपेक्षित होता.