शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मल्लखांबामुळेच अ‍ॅथलेटिक्समध्ये यश

By admin | Updated: June 28, 2016 03:21 IST

‘‘सुमारे २५ वर्षांपूर्वी सातारा येथे झालेल्या राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत पूरलेल्या मल्लखांबावर प्रात्यक्षिके केली होती.

मुंबई : ‘‘सुमारे २५ वर्षांपूर्वी सातारा येथे झालेल्या राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत पूरलेल्या मल्लखांबावर प्रात्यक्षिके केली होती. मल्लखांबाच्या सरावामुळेच अ‍ॅथलेटीक्स मध्ये मी यशस्वी होऊ शकले,’’ असे मत आंतरराष्ट्रीय साताऱ्याची अ‍ॅथलिट - प्रशिक्षक आणि माजी मल्लखांबपटू स्नेहलता राजपूत यांनी व्यक्त केले. दादर येथील पावसाळी मल्लखांब शिबीर समारोप कार्यक्रमात राजपूत बोलत होत्या. दादर, शिवाजी पार्क येथील श्री समर्थ व्यायाम मंदिरात ३२ व्या समर्थ पावसाळी मल्लखांब शिबीराचा समारोप समारंभ पार पडला. यावेळी अदिती व्होरा, अनघा चव्हाण, प्रणय जळगावकर आणि केतुक पटेल यांना ‘उत्कृष्ट खेळाडू’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे सागर राणे आणि तेजल मुसळे यांना उत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी क्रीडा समालोचक अरुण वागळे, निकेतन वैदिक पाठशाळेचे प्रभाकर पवार उपस्थितीत होते. शालांत परीक्षेत ९८.४ टक्के गुण मिळवणाऱ्या समर्थच्या राष्ट्रीय मल्लखांबपटूने मल्लखांबाला पर्याय नाही ही कविता सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. शिबिरात ५ ते ८५ वयोगटांतील सुमारे ३५७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी दादर येथील कमला मेहता अंध शाळेच्या विद्यार्थीनींनी दोरीवरील मल्लखांबाचे चित्तथराराक प्रात्यक्षिके सादर केली. तसेच समर्थच्या मल्लखांबपटूंनीही दिप रोप, हत्यारी मल्लखांब, बाटल्यांवरील मल्लखांबाचे थरारक प्रात्यक्षिके सादर केली. (क्रीडा प्रतिनिधी)>सकारात्मक विचार करावा...इतर खेळाच्या प्रशिक्षक, संघटनांनी केवळ क्रिकेटचा नाव ठेवू नये, तर क्रिकेटसारखी लोकप्रियता मिळवण्यासाठी काय करावे लागेल, याचा विचार करुन त्यानुसार पावले उचलावी. शिवाय आपल्या खेळाचा प्रसार करताना आपण कोठे कमी पडत आहोत, हे जाणून घेत त्याचा सकारात्मक पद्धतीने विचार करावा, असे परखड मत मिलिंद वागळे यांनी व्यक्त केले.