शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आत्मसमर्पितांना हक्काचा निवारा

By admin | Updated: October 19, 2015 02:42 IST

गृह विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या आत्मसमर्पण योजनेअंतर्गत मागील १० वर्षांत ५०२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यापैकी १०१ जणांना जागा उपलब्ध करून देत

दिगांबर जवादे,  गडचिरोलीगृह विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या आत्मसमर्पण योजनेअंतर्गत मागील १० वर्षांत ५०२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यापैकी १०१ जणांना जागा उपलब्ध करून देत, घर बांधण्यासाठी मदतही करण्यात आली आहे.नक्षलवादी चळवळीमध्ये जाणारे बहुतेक तरुण गरीब आहेत. नक्षलवाद्यांनी दिशाभूल करून त्यांना चळवळीमध्ये सामील करून घेतले. ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर शासनाने २००५पासून नक्षल आत्मसमर्पण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत संबंधित नक्षलवाद्यांवर असलेले सर्व जुने गुन्हे माफ करून त्यांच्या पदाप्रमाणे रोख रक्कमसुद्धा दिली जाते. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्याला चांगल्या पद्धतीने जीवन जगता येते, ही बाब लक्षात आल्यानंतर आत्मसमर्पणाचे प्रमाण वाढत चालले आहे. आत्मसमर्पण करणारी व्यक्ती पुन्हा आपल्या दुर्गम भागातील गावाकडे गेल्यास त्याच्या जीविताला नक्षलवाद्यांकडून धोका निर्माण होण्याची सर्वाधिक शक्यता राहते. त्यामुळे योजनेअंतर्गत पैसा मिळाला तरी राहण्याची फार मोठी समस्या निर्माण होते. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांनी गडचिरोली शहराच्या जवळपास राहण्याची इच्छा पोलीस विभागाकडे वर्तविल्यानंतर पोलीस विभाग तशा प्रकारचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून संबंधित व्यक्तींसाठी जागा उपलब्ध करून देते. आत्मसमर्पण योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत १०१ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना घरांचे पट्टे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आत्मसमर्पण योजनेच्या माध्यमातून शासनाने आपल्याला नवजीवन मिळवून दिले आहे, अशी प्रतिक्रिया काही आत्मसमर्पित नक्षल्यांनी बोलूनही दाखविली आहे.