शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

उपनगरीय रेल्वेला मेट्रो, मोनोप्रमाणे संरक्षण

By admin | Updated: July 7, 2016 00:39 IST

मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकाला आता मेट्रो आणि मोनो रेल्वेप्रमाणेच संरक्षण मिळणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनसोबत नुकतीच एक बैठक पार पडली.

- सुशांत मोरे,  मुंबई

मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकाला आता मेट्रो आणि मोनो रेल्वेप्रमाणेच संरक्षण मिळणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनसोबत नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत एक हजार सुरक्षा रक्षक कॉर्पोरेशनकडून मिळावेत, यावर चर्चा करण्यात आली. त्यासाठी शासनाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त (लोहमार्ग) मधुकर पाण्डेय यांनी लोकमतशी बोलताना दिली. उपनगरीय रेल्वे स्थानक आणि हद्दीत होणाऱ्या गुन्हेगारीवर नियंत्रण तसेच गुन्ह्यांचा छडा लावण्याची जबाबदारी ही लोहमार्ग पोलीसांवर आहे. तर रेल्वे मालमत्तांच्या सुरक्षेची जबाबदारी ही आरपीएफवर आहे. सध्या लोहमार्ग पोलिसांकडे साडे तीन हजार एवढे मनुष्यबळ आहे. अपुऱ्या मनुष्यबळाअभावी गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवताना लोहमार्ग पोलिसांची चांगलीच तारांबळ उडते. त्यामुळे लोहमार्ग पोलिसांच्या मदतीला होमगार्डही देण्यात आले आहेत. परंतु काही होमगार्ड हे अनेक कारणांमुळे गैरहजर राहतात. त्यामुळे लोहमार्ग पोलिसांना काही वेळेला आरपीएफचीही मदत घ्यावी लागते. मात्र पश्चिम आणि मध्य रेल्वे सुरक्षा दलाकडेही अपुरे मनुष्यबळ असल्याने आणखी काही सुरक्षा रक्षक मिळावेत, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. त्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी मेट्रो आणि मोनोची सुरक्षा असणाऱ्या महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनशी बोलणी सुरु केली आणि ५00 सुरक्षारक्षक मिळावेत, असा प्रस्ताव तयार करुन तो शासनाकडे पाठवला. मात्र आता हाच प्रस्ताव नव्याने तयार करुन तो पुन्हा एकदा शासनाकडे पाठवण्याची तयारी लोहमार्ग पोलिसांकडून करण्यात येत आहे. एक आठवड्यापूर्वीच महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनसोबत बैठक पार पडली. यात नव्या प्रस्तावानुसार एक हजार सुरक्षा रक्षक मिळण्यासंदर्भात चर्चा झाली. यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल. - मधुकर पाण्डेय (पोलीस आयुक्त- लोहमार्ग)