शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने केले उपनगर चिंब

By admin | Updated: July 3, 2017 04:54 IST

मुंबई शहराच्या तुलनेत पूर्व आणि पश्चिम उपनगरात रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, शहरात १५.८८, पूर्व उपनगरात

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई शहराच्या तुलनेत पूर्व आणि पश्चिम उपनगरात रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, शहरात १५.८८, पूर्व उपनगरात ६०.८० आणि पश्चिम उपनगरात ५४.७३ मिलीमीटर पाऊस पडला आहे. मुंबई व्यतीरिक्त ठाणे, नवी मुंबईतही जोरदार पावसाने हजेरी लावली असून, पुढील ४८ तासांसाठी पावसाचा मारा कायम राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, शहरासह उपनगरात सरीवर सरी कोसळत असतानाच पावसाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी चौपाटयांवर गर्दी झाल्याचे चित्र होते.मुंबईसह आसपासच्या परिसरात पावसाचा तडाखा सुरु असतानाच पडझडीच्या घटनाही सुरुच आहेत. शहरात २, पूर्व उपनगरात ३ आणि पश्चिम उपनगरात १ अशा एकूण ६ ठिकाणी बांधकामाचा भाग पडला. घाटकोपर येथील अल्ताफ नगरमध्ये भिंत पडून एक महिला जखमी झाली. जखमी महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालय प्रशासनाने महिलेला मृत घोषित केले. मृत महिलेचे नाव मालती नारायण जाधव (४५) आहे. पी.एल. लोखंडे मार्गावरील धम्मदिप चाळ येथील तळमजला अधिक एक असे बांधकाम असलेल्या चाळीचा काही भाग पडला. यात दोन माणसे फसली होती. त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. जोगेश्वरी पूर्वेकडील फ्रान्सिस वाडी येथील नाल्यावरील पादचारी पूल पडला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले होते. दुर्घटनेत सुदैवाने कोणालाही मार लागलेला नाही. कांदिवली येथील खान गल्लीमध्ये एका घरात गॅस लिकेज झाल्याने आग लागली आणि सिलेंडरचा स्फोट झाला. परिणामी आग लागून तीनजण जखमी झाले. जखमींना आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुलाब यादव, राजु यादव आणि आसिफ मोहम्मद अशी जखमींची नावे आहेत.दरम्यान, शहरात ३, पश्चिम उपनगरात ७ अशा एकूण १० ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात २, पूर्व उपनगरात २० आणि पश्चिम उपनगरात ५५ अशा एकूण ७७ ठिकाणी झाडे पडली. सुदैवाने दुर्घटनांत हानी झाली नाही.