शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुरूड दुर्घटनेचा अहवाल दोन दिवसांत सादर करा

By admin | Updated: February 5, 2016 04:03 IST

आबेदा इनामदार महाविद्यालयाच्या वतीने मुरुड -जंजिरा येथे आयोजित करण्यात आलेल्या सहली दरम्यान १२ विद्यार्थी बुडून मृत्युमुखी पडल्याच्या घटनेचा अहवाल

पुणे : आबेदा इनामदार महाविद्यालयाच्या वतीने मुरुड -जंजिरा येथे आयोजित करण्यात आलेल्या सहली दरम्यान १२ विद्यार्थी बुडून मृत्युमुखी पडल्याच्या घटनेचा अहवाल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दोन दिवसांत सादर करावा, असे आदेश पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. विजय नारखेडे यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाताना महाविद्यालय प्रशासनाने सर्व नियमांचे पालन केले होते का, हे स्पष्ट होणार आहे.सहलीला जाण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) व राज्य शासनाने काही नियमावली तयार केली आहे. तिचे पालन महाविद्यालयाकडून करण्यात आले होते का, तसेच विद्यार्थी व शिक्षकांना याबाबत कल्पना देण्यात आली होती का, या गोष्टींची माहिती घेण्यासाठी उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाने अहवाल मागविला आहे. त्याबाबतचे पत्र विद्यापीठाच्या कुलसचिव कार्यालयास बुधवारी पाठविण्यात आले आहे.विभागीय सहसंचालक डॉ. विजय नारखेडे म्हणाले, दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, याबाबतचा चौकशी अहवाल येत्या दोन दिवसांत सादर करावा, असे पत्र विद्यापीठाला पाठविण्यात आले आहे. विद्यापीठाने चौकशी अहवाल सादर करताना महाविद्यालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या सहलीचे स्वरूप व उद्दीष्ट काय होते, सहलीला जाण्यासाठी पालकांची व विद्यार्थ्यांची पूर्वपरवानगी घेतली होती का, महाविद्यालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीचे पालन केले होते का, महाविद्यालयाने किंवा संस्थेने बैठक घेऊन सहली संदर्भात नियोजन केले होते का, सहली दरम्यान दुर्घटना घडू नये यासाठी संंस्था व महाविद्यालयाकडून कोणती खबरदारी घेण्यात आली होती, या बाबतचा तपशील चौकशी अहवालात असेल, असेही नारखेडे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)