शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती घोटाळ्याचा एसआयटीचा अहवाल शासनाला सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 03:53 IST

कोट्यवधी रुपयांच्या शिष्यवृत्ती घोटाळ्याचा तपास पूर्ण करून विशेष तपास पथकाने (एसआयटी) राज्य शासनाला अहवाल सादर केला आहे.

नागपूर : कोट्यवधी रुपयांच्या शिष्यवृत्ती घोटाळ्याचा तपास पूर्ण करून विशेष तपास पथकाने (एसआयटी) राज्य शासनाला अहवाल सादर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी राज्य शासनाला कायद्याच्या चौकटीत राहून त्या अहवालानुसार पुढील कारवाई करण्यास मुभा दिली. पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम हे तपास पथकाचे अध्यक्ष होते.काही शिक्षण संस्थांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करून शिष्यवृत्ती घोटाळ्याचा तपास अवैधपणे करण्यात येत असल्याचा आरोप केला होता. राज्य शासनाने स्वत:ची बाजू स्पष्ट करताना याचिकाकर्त्यांपैकी एकाही शिक्षण संस्थेवर कारवाई केली नसल्याचे सांगितले. तसेच, शिक्षण संस्थांनी कारवाईपूर्वीच न्यायालयात येणे चुकीचे असल्याचा दावा केला व शिष्यवृत्तीतील गैरव्यवहारामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची बाब निदर्शनास आणून दिली. न्यायालयाने हे मुद्दे लक्षात घेऊन शासनाला कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यास सांगितले. शासनाची कारवाई अवैध वाटल्यास दाद मागण्याचे मार्ग शिक्षण संस्थांसाठी मोकळे असल्याचे स्पष्ट करून न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व न्यायमूर्ती अरुण उपाध्ये यांनी हे प्रकरण निकाली काढले.