शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सुभाष मैदानात गर्दुल्ल्यांचा अड्डा

By admin | Updated: August 23, 2016 04:01 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या सुभाष मैदानाची दुरवस्था झाली आहे.

मुरलीधर भवार,

कल्याण- कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या सुभाष मैदानाची दुरवस्था झाली आहे. त्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तेथील प्रेक्षक गॅलरीत बेकायदा व्यवसाय सुरू आहे. गर्दुल्ल्यांचा अड्डा झाला आहे. महापालिकेसोबत पोलिसांचेही दुर्लक्ष होत असल्याची ओरड क्रीडाप्रेमींकडून होत आहे. मैदानात भरपूर गवत उगवले आहे. ते काढून मैदान खेळासाठी मोकळे करण्याची तसदीही महापालिकेला घ्यावीशी वाटत नाही. त्या ठिकाणी काही बैलगाडीवाले गवत चरण्यासाठी बैलांना सोडतात. एका बाजूला मातीचा ढिगारा पडून आहे. मैदानाभोवती असलेल्या जॉगिंग ट्रॅकचे काही ठिकाणचे दिवे गायब झाले आहेत. काही ठिकाणी मैदानात पाण्याचे तळे साचले असून दीड फुटापर्यंत खड्डा पडला आहे. अनेक जण मैदानाभोवती असलेल्या ट्रॅकच्या बाजूला बसण्यासाठी असलेल्या बाकांवर दुपारी चक्क वामकुक्षी घेतात. मैदानातील प्रेक्षक गॅलरी म्हणजे डम्पिंग ग्राउंड झाले आहे. त्या ठिकाणी असलेल्या एका खोलीत गर्दुल्ल्यांनी आपले बस्तान बसवले आहे. दुपारच्या वेळेत ही मंडळी गायब होतात. रात्रीच्या अंधारात येथे बेकायदा व्यवसाय सुरू असतात. दुपारच्या वेळेत दोन तरुण नशा करत होते, तर दोन तरुण दारू पीत होते. या ठिकाणी महाराष्ट्र क्रिकेट स्पोर्ट्स अकादमीला जागा दिली आहे. ते कार्यालय बंद आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना कट्टा दिला आहे. प्रेक्षक गॅलरीच्या खालच्या खोल्यांमध्ये काही भंगारचे सामान भरले आहे. गॅलरीच्या छताचे पत्रे तुटले आहे. लोखंडी अँगल्स गंजलेले आहेत. सुभाष मैदानात महापालिकेने सुरक्षारक्षक नेमलेले नाहीत. स्थानिकांनी यासंदर्भात बाजारपेठ पोलिसांकडे तक्रारी केलेल्या आहेत. त्याची दखल पोलिसांकडून घेतली जात नसल्याची ओरड या परिसरातील नागरिकांनी केली आहे.>निधी केवळ कागदावरचव्हीनस स्पोटर््स अकादमीचे ईश्वरचंद्र कुमुद यांनी सांगितले की, सुभाष मैदानावर खेळ खेळले जावेत, अशी अपेक्षा आहे. त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे. महापालिका मुख्यालयाच्या शेजारी असलेल्या मोठ्या मैदानाची ही दुरवस्था आहे. तर, अन्य मैदानाची काय स्थिती असेल, याची कल्पना केलेली बरी. महापालिकेने अर्थसंकल्पात कोट्यवधींची तरतूद मैदान सुसज्ज करण्यासाठी केलेली आहे. सुभाष मैदानाची दुरवस्था पाहून हा निधी केवळ कागदावर असल्याचे दिसते.