शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत दारुडया वाहनचालकाचा खाकीवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2016 00:24 IST

दारू पिऊन वाहन चालविताना पकडलेल्या आरोपी दुचाकीचालकाने एका पोलीस हवालदाराला जबर मारहाण केली. या मारहाणीत वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार प्रकाश बारंगे गंभीर जखमी झाले.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. १६  : दारू पिऊन वाहन चालविताना (ड्रंक न ड्राईव्ह) पकडलेल्या आरोपी दुचाकीचालकाने एका पोलीस हवालदाराला जबर मारहाण केली. या मारहाणीत वाहतूक शाखेचे (उत्तर विभाग) पोलीस हवालदार प्रकाश बारंगे (वय ४५) गंभीर जखमी झाले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेमुळे पोलीस दलात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.

बारंगे यांचे सहकारी हवालदार मोहन रेवतकर यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री संत्रा मार्केट परिसरात वाहतूक शाखेचे पोलीस ड्रंक न ड्राईव्हची कारवाई करीत होते. आरोपी श्रीकांत ऊर्फ सूर्यकांत अरुण व्यास (रा. माता कचेरी वसाहतीजवळ) स्प्लेंडरवर ट्रीपल सिट येताना दिसल्याने हवालदार रेवतकर आणि बारंगे यांनी त्याला थांबवले. तो दारूच्या नशेत तर्र असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी त्याला लायसेन्ससह ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली. त्यानंतर हवालदार बारंगे यांनी दोन आरोपींना तर रेवतकर यांनी एकाला दुचाकीवर बसवले तसेच पोलीस ठाण्याकडे निघाले. रामझुल्याजवळच्या नटवर सलूनजवळ आरोपींनी दुचाकीवरून उडी मारून पळ काढला. त्यामुळे बारंगे यांनी दुचाकी थांबवून आरोपी व्यासचा पाठलाग करून त्याला पकडले.

यावेळी आरोपी व्यासने बाजूचा दगड उचलून बारंगे यांना डोक्यावर मारणे सुरू केले. एकापाठोपाठ अनेक वार केल्यामुळे हवालदार बारंगे रक्ताने न्हाऊन निघाले. ते खाली कोसळल्यानंतर आरोपी पळून गेला. मागून आलेल्या रेवतकर यांना हा प्रकार दिसताच त्यांनी अन्य एका पोलीस शिपायाच्या मदतीने बारंगे यांना गंभीर अवस्थेत मेयोत नेले. दरम्यान, कंट्रोल रूम आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती देण्यात आली. त्यानंतर सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी, वाहतूक शाखेच्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी मेयोत जाऊन बारंगे यांची भेट घेतली. डॉक्टरांशीही चर्चा केली.या घटनेने पोलीस दलात तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, आरोपी व्यासच्या शोधासाठी वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली होती.दोन दिवसात दुसरा हल्लानागपुरात खाकीवर झालेला दोन दिवसातील दुसरा तर पाच दिवसातील चवथा हल्ला आहे. गुरुवारी तुषार वर्मा नामक आरोपीने एपीआय इंगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण केली होती. तर, सोमवारी कळमन्यातील एपीआय पवार यांना रजत असुफा व रमन असुफा नामक आरोपींनी मारहाण केली होती. ११ सप्टेंबरला आरोपी मुकेश मते याने पोलीस शिपाई श्याम नरुले यांना मारहाण केली होती. खासगी रुग्णालयात हलविलेमध्यरात्री १२ च्या सुमारास बारंगे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मेयोतून रामदासपेठेतील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. या हल्ल्याची वार्ता शहर पोलीस दलात वायुवेगाने पसरली. त्यामुळे पोलीस बांधवांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.