शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

उपअभियंत्यांनी केली पाहणी

By admin | Updated: January 21, 2017 03:44 IST

वाडा तालुक्यातील मानिवली येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला तडे गेले असून पत्रे तुटले आहेत.

वाडा : वाडा तालुक्यातील मानिवली येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला तडे गेले असून पत्रे तुटले आहेत. वर्गखोलीची दुरवस्था झाली असून दरवाजे, खिडक्या निघाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांुना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत आहे. याबाबतचे वृत्त बुधवारच्या लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच बांधकाम प्रशासन खडबडून जागे झाले आणि गुरूवारी बांधकाम विभागाचे प्रभारी उपअभियंता विजय मोकाशी यांनी शाळेची पाहणी करून ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल दोन महिन्यापूर्वीच दिल्याची माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या या शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग असून ३६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथील वर्ग खोलीचे बांधकाम गेल्या २५ ते ३० वर्षापूर्वी करण्यात आले होते. या इमारतीला आता तडे गेले असून पत्र्यांना भोके पडली आहे. दरवाजे व खिडक्या निखळल्या आहेत. धोकादायक म्हणून घोषित केलेल्या या वर्गखोलीत दोन वर्षापासून विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिकत आहेत. लगतच्या दुसऱ्या खोलीत वर्ग भरवले जात आहेत. त्यांची दुरूस्ती करावी अन्यथा नवीन वर्गखोली बांधावी अशी मागणी शिक्षण प्रशासनाकडे ग्रामस्थांनी केली होती. मात्र तिच्याकडे प्रशासन गांभिर्याने बघत नव्हते. जर या बाबतचा अहवाल दोन महिन्यापूर्वी दिला तर संबंधित यंत्रणेने त्यावर काय कारवाई केली नसल्यास ती का झाली नाही? याचा खुलासा मात्र सार्वजनिक बांधकामने अद्याप केलेला नाही. (प्रतिनिधी)>अहवाल देऊनही कारवाई का झाली नाही?पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता विजय मोकाशी यांनी मानिवली शाळेला भेट देऊन पाहणी केली. धोकादायक इमारतीचा अहवाल गेल्या दोन महिन्यापूर्वीच शिक्षण विभागाला दिला.त्यांच्यासमवेत वाडा पंचायत समितीच्या सभापती मृणाली नडगे, उपसभापती माधुरी पाटील उपस्थित होत्या. त्यांनी या बाबतचा जाब त्यांना विचारला नाही.