शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

दारूविक्रेत्याचा मुलगा उपजिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2016 02:28 IST

वडील गावठी दारू विकायचे. घरीही दारू पिऊन यायचे अन् मारायचे. घरची परिस्थती तशी हलाखीची. त्यात अधिकारी व्हायच्या जिद्दीने पछाडले, मामांनी मदत केली, पदवीचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर दररोज

पुणे : वडील गावठी दारू विकायचे. घरीही दारू पिऊन यायचे अन् मारायचे. घरची परिस्थती तशी हलाखीची. त्यात अधिकारी व्हायच्या जिद्दीने पछाडले, मामांनी मदत केली, पदवीचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर दररोज १६-१६ तास अभ्यास करून, अवघ्या २२ व्या वर्षी एका तरुणाने उपजिल्हाधिकारी पदाच्या परीक्षेत यश मिळवले. एवढेच नव्हे, तर रवींद्र राठोड याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवत, सर्वात कमी वयात उपजिल्हाधिकारी पद मिळविले.रवींद्रची निवड केवळ उपजिल्हाधिकारी पदासाठीच नाही, तर मंत्रालयातील सहायक कक्षाधिकारी आणि विक्रीकर निरीक्षक म्हणूनही झाली आहे. रवींद्र यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील जनुना या खेडेगावचा. घरात खाण्या-पिण्याचीही आबाळ. मात्र, आईने त्याला पाठबळ दिले. कठीण काळात त्याचे मामा निरंजन जाधव यांनी त्याला आर्थिक मदत केली. शिक्षण घेताना त्याने एमपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. मनोहर भोळे यांनी त्याला मार्गदर्शन केले. त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. राज्यशास्त्र विषयात बीएचे शिक्षण घेत असताना, शेवटच्या वर्षी २०१४ मध्ये त्याने पहिल्यांदा एमपीएससीची पूर्वपरीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाला. त्यामुळे त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. मनावर दडपणही आले, आता मुख्य परीक्षा आणि मुलाखतीला सामोरे जायचे. जिद्द, चिकाटी आणि एकाग्रतेच्या जोरावर त्याने मुख्य परीक्षा आणि मुलाखत हे दोन्ही टप्पे यशस्वीपणे पार केले. (प्रतिनिधी)