शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासगटाच्या शिफारशी लवकरच

By admin | Updated: July 16, 2016 03:30 IST

सटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसंदर्भात वेतनश्रेणी अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली आहे. या अभ्यासगटाच्या शिफारशी येत्या चार महिन्यांत सादर होतील

मुंबई : एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसंदर्भात वेतनश्रेणी अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली आहे. या अभ्यासगटाच्या शिफारशी येत्या चार महिन्यांत सादर होतील, अशी माहिती परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली. वेतनश्रेणी अभ्यासगटाची पहिली बैठक रावते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्या वेळी कामगारांच्या वेतनाबरोबर त्यांना मिळणारे भत्ते, प्रोत्साहन योजना याबाबतही अभ्यासगट शिफारशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या ६८ वर्षांत एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत कोणतीच रचनात्मक व्यवस्था निर्माण झालेली नाही. दर चार वर्षांनी विशिष्ट पद्धतीने कामगारांना वेतनवाढ दिली जाते. कामाचे स्वरूप आणि मिळणारे वेतन याचा संबंध जुळवून वेतननिश्चिती झाली पाहिजे. याच उद्देशाने वेतन अभ्यासगटाची निर्मिती करण्यात आली आहे. त्याची पहिली बैठक पार पडली. या बैठकीला रावते यांच्यासह एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल आणि वेतन अभ्यासगटाचे अध्यक्ष डी.आर. परिहार तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत अभ्यासगटाच्या कार्यक्षमतेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. एसटी कामगारांशी प्रतिनिधिक स्वरूपात संवाद साधून त्यांच्या गरजा व अपेक्षा जाणून घ्याव्यात, वेतनासंदर्भात शिफारशी करताना एसटीच्या फायदा-तोट्याचा पूर्वलक्षी प्रभावाने विचार करू नये. कामगाराला मिळणारे प्रत्यक्ष वेतन, महागाई निर्देशांक व वस्तुस्थितीजन्य गरजा लक्षात घ्याव्यात आणि परिवहन सेवा देणाऱ्या अन्य निमशासकीय महामंडळाच्या वेतन पद्धतीचाही अभ्यास करावा, अशा सूचना रावते यांनी केल्या. एसटी महामंडळातील अधिकारी वर्गाच्या वेतननिश्चितीबाबतही अभ्यासपूर्व शिफारशी वेतनश्रेणी अभ्यास गटाकडून केल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)