शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कामोठेमधील विद्यार्थ्यांची तारेवरची कसरत

By admin | Updated: July 15, 2017 02:38 IST

कळंबोलीवरून पळस्पे फाटा व जेएनपीटीकडे जाणाऱ्या रोडचे विस्तारीकरण सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कळंबोलीवरून पळस्पे फाटा व जेएनपीटीकडे जाणाऱ्या रोडचे विस्तारीकरण सुरू आहे. ठेकेदाराने योग्य खबरदारी घेतली नसल्याने कामोठेमधील केपीसी इंग्लिश हायस्कूलकडे जाणारा मार्ग बंद झाला असून, विद्यार्थ्यांना लाकडी फळीवरून उडी मारावी लागत आहे. नवी मुंबई, पनवेलमधून जाणाऱ्या महामार्गांच्या रुंदीकरण व दुरुस्तीचे काम करताना नागरिकांच्या गैरसोयीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. सायन-पनवेल व मुंबई-गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा होत असताना आता कळंबोली ते पळस्पे फाटा व जेएनपीटीकडे जाणाऱ्या रोडवरील समस्याही वाढू लागल्या आहेत. कामोठेमध्ये महामार्गाला लागून केपीसी इंग्लिश हायस्कूल आहे. महामार्ग व शाळेच्या आवाराच्या मध्ये गटाराचे काम सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. रोडपासून गटाराची उंची जास्त आहे. यामुळे बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडी फळ्यांच्या आधारे पूल तयार करण्यात आला असून त्यावरून मुले शाळेच्या आवारामध्ये उडी मारत आहेत. पालकांना जीवावर उदार होऊन मुलांना त्या पुलावरून पलीकडे पाठवावे लागत असल्याचे चित्र शुक्रवारी पाहावयास मिळाले. या परिसरामध्ये रोडचे काम सुरू असताना त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. योग्य उपाययोजना केल्या नाहीत तर अपघात होवून विद्यार्थी जखमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लाकडी फळी व तयार केलेली तात्पुरता रस्ता धोकादायक असल्याचे मत व्यक्त केले जात असून अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.