शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना मिळणार थेट घरपोच पुस्तके

By admin | Updated: January 29, 2015 04:20 IST

सुमारे सहा लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी संख्या आणि साडेचार हजार अभ्यास केंद्रे असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमाची पुस्तके आता घरपोच मिळणार

संदीप भालेराव, नाशिकसुमारे सहा लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी संख्या आणि साडेचार हजार अभ्यास केंद्रे असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमाची पुस्तके आता घरपोच मिळणार आहेत.पुस्तके वेळेत मिळत नसल्याची तक्रार त्यामुळे दूर होणार असून, विद्यार्थ्यांना अभ्यास केंद्राचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत. कधी छपाई, तर कधी वाहतुकीच्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांना पुस्तके वेळेत मिळत नाही. या दोन्ही यंत्रणा काही प्रमाणात नियंत्रणात आल्यानंतर मनुष्यबळाचे कारण दाखवून विभागीय केंद्रांकडून दिरंगाई करण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या. काही विभागीय केंद्रांनी तर पुस्तके वितरणात दिरंगाई होत असल्याचे मान्य करताना मनुष्यबळ पुरविण्याची मागणी करीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितापेक्षा नोकरभरती करून आपले हितसंबंध जोपासण्याचीच संधी साधल्याची उदाहरणे आहेत. पुस्तके वेळेत न मिळण्याचा प्रकार कमी करण्यासाठी विद्यमान कुलगुरूंनी पुस्तके थेट विद्यार्थ्यांच्या घरीच धाडण्याची योजना आणली आहे. टपालच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच पुस्तके वितरित करण्यासाठीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार ३० कोटींची ४० लाख पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती वेळीच पडावी, यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.मात्र वितरणाची व्यवस्था टपाल खात्यावर असल्याने विद्यापीठाला त्यांच्या यंत्रणेवरच अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे घरपोच पुस्तके देण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रयोगात विद्यापीठाची स्वत:ची अशी यंत्रणा नसल्यामुळे त्यातून अनेक प्रश्नही निर्माण होऊ शकतात.