शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लहान संस्थांमधील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार?

By admin | Updated: April 21, 2016 00:51 IST

पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशप्रक्रियेतून दिल्या जाणा-ऱा २० टक्के इन हाऊस कोट्यातून एका

पिंपरी : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशप्रक्रियेतून दिल्या जाणा-ऱा २० टक्के इन हाऊस कोट्यातून एका नामांकित संस्थेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्याच महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे लहान शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी नामांकित कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता वाढली आहे.पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे २0१६-१७ या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने राबविली जात असून, प्रवेशप्रक्रियेसंदर्भात राज्य शासनाने नियमवली तयार केली आहे. एका शैक्षणिक संस्थेच्या एकापेक्षा जास्त माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये असतील तर त्यांना २0 टक्के इन हाऊस कोट््याअंतर्गत त्यांच्याच शाळांमधील विद्यार्थ्यांना संस्थांतर्गत प्रवेश देण्यासाठी अधिक जागा मिळणार आहे. त्यामुळे शहरातील नामांकित शिक्षण संस्थांमधील शाळांमधून दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या संस्थेच्या नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता वाढली आहे. एखाद्या संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयाकडे अकरावीच्या ८४0 जागा असतील आणि याच संस्थेच्या ४ माध्यमिक शाळा असतील तर संबंधित संस्थेला सुमारे १६0 जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देता येईल. त्याचप्रमाणे ५ टक्के व्यवस्थापन कोट्यातून सुमारे ४0 जागांवर प्रवेश देता येऊ शकेल. परिणामी एकाच संस्थेला सुमारे २00 जागा भरण्याची संधी मिळू शकते.एखाद्या नामांकित संस्थेमधील अकरावीच्या ८00 जागांवर त्यांच्याच संस्थेतील २00 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला तर दुसऱ्या शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी केवळ ६00 जागा उपलब्ध राहतील. परिणामी गुणवत्ता असूनही लहान संस्थांमधील विद्यार्थी नामांकित महाविद्यालयातील प्रवेशापासून वंचित राहू शकतात. त्याचप्रमाणे मोठ्या संस्थांमधील विद्यार्थ्यांना दोन ठिकाणी प्रवेशाची संधी मिळू शकते. त्याचप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयांना स्वत:ची आॅनलाईन प्रक्रिया राबवावी लागू शकते. त्यामुळे शासनाने याबाबत पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे, असे अकरावी प्रवेशप्रक्रियेत काम करणाऱ्या एका सदस्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. (प्रतिनिधी)