शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

‘विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे’

By admin | Updated: January 7, 2017 03:13 IST

विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे तरच त्यांची प्रगती होईल.

कासा (ता. डहाणू) : विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे तरच त्यांची प्रगती होईल. शिक्षणाची प्रबळ इच्छा असेल तर कोणतीही परिस्थिती आडवी येत नाही त्यावर मात करता येते असे मत आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांनी व्यक्त केले. ते उधवा येथे ४२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. जिल्हा परिषद शाळा उधवा लिटल चॅम्प इंग्लीश मिडीअम स्कूल, शिक्षण विभाग पं. स. तलासरी व विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उधवा येथील जिल्हा परिषद शाळेत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते. सदर प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी खासदार चिंतामण वनगा, आमदार पास्कल धनारे, जि.प. अध्यक्षा सुरेखा थेतले जि.प. सभापती धर्मा गोवारी, तलासरी पं.स. सभापती वनशा दूमडा उपसभापती भानुदास भोये, गटविकास अधिकारी राहुल धूम, गटशिक्षणाधिकारी कमळाकर सुतार सरपंच जसू भोये उपसरपंच रमेश घूटे, शाळेचे मुख्याध्यापक सोमनाथ भोये, विज्ञान मंडळ अध्यक्ष हेमंत अधिकारी आदी उपस्थित होते.आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता आहे. आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रकल्पात संधी मिळाल्यास ते ही नवीन संशोधन करू शकतील. तसेच आदिवासी विभागाकडून अनेक योजना राबविल्या जातात त्याचा लाभ घेऊन आदिवासी विद्यार्थ्यांनी आपला विकास साधावा असेही सवरा यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनउत्कर्ष प्रबोधिनी उध्वा संस्थेचे अध्यक्ष कैलास जाधव यांनी केले. या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विभागातून २९, माध्यमिक विभागातून १६, शिक्षकांचे साहित्य ७, असे एकूण ५३ प्रकल्प मांडले असल्याचेही जाधव यांनी सांगितले. यावेळी सभापती वनशा दुमडा व शिक्षक संघटना कार्याध्यक्ष संतोष पावडे यांनी मार्गदर्शन केले. या प्रदर्शनात परिक्षणाचे काम राजू मोरे, जयंता पाटील व डॉ. राबड यांनी केले. (वार्ताहर) >जिल्हा स्तरासाठी प्रकल्प निवडप्राथमिक विभागातून १) आग सुचक यंत्र, लिटील चॅम्प उधवा, २) नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, जि.प. शाळा उधवा, ३) शेतकऱ्यांसाठी शितगृह, माध्यमिक विद्यालय तलासरी, ४) हरित विद्युतशक्ती, आश्रमशाळा गिरगावमाध्यमिक विभागातून १) दळव वळणासाठी सौर उर्जेचा वापर, जादीराणा हायस्कूल, २) स्मार्ट स्टडी लॅम्प, वेवजी हायस्कूल, ३) आपत्ती सुचक यंत्र, उपलाटा हायस्कूल, ४) सोलर संरक्षणित सिमा, झरी आश्रमशाळा