शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात ?

By admin | Updated: July 1, 2016 04:13 IST

लाईट मोटार व्हेइकल (स्कूल व्हॅन), एसटी आणि बेस्टच्या बसेस नियमांची पायमल्ली करून विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात घालत आहेत

मुंबई : विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या लाईट मोटार व्हेइकल (स्कूल व्हॅन), एसटी आणि बेस्टच्या बसेस नियमांची पायमल्ली करून विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात घालत आहेत, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने यासंबंधी राज्य सरकार, परिवहन विभाग आणि परिवहन आयुक्तांना दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले.विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी २०१२ मध्ये सुधारित नियम तयार केले आणि स्कूल बसेसना त्याची अंमलबजावणी करणे बंधनकारक केले. मात्र स्कूल बस व्यतिरिक्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या लाईट मोटार व्हेइकल्सनाही विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी परमीट दिले जात आहे. परंतु, या व्हॅन्सची ‘स्कूल बस’ च्या श्रेणीत गणना करण्यात आली नाही. त्यामुळे या व्हॅन्स स्कूल बससाठी असलेले नियम न पाळता विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहेत. त्याशिवाय बेस्ट, एसटीही शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतात. पण विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली खबरदारी घेण्यात येत नाही. त्यामुळे राज्य सरकारला या नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका ‘पॅरेंट-टीचर असोसिएशन युनायटेड फोरम’ ने केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती.या याचिकेद्वारे गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. मुंबई व उपनगरांतील विद्यार्थी अशा वाहनांचा (व्हॅन, बेस्ट) वापर करतात. त्याशिवाय उर्वरित राज्यातील मुलेही शाळेत जाण्यासाठी एसटीचा वापर करतात. नियमांची पायमल्ली करून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालण्यात येतो, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. याचिकेनुसार, राज्य सरकारच्या नियमानुसार, शाळा आणि आॅपरेटर्समध्ये करार होणे बंधनकारक आहे. तसेच विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर ‘स्कूल बस’ असे लिहीणे बंधनकारक आहे. संबंधित वाहनावर मार्ग, वेळही नमूद करणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थीनींच्या सुरक्षेसाठी महिला वॉर्डन असणे बंधनकारक आहे. मात्र स्कूल व्हॅन, बेस्ट आणि एसटी नियम पाळत नसल्याने मुलांना जीव गमवावा लागत आहे. तसेच बलात्कारासारख्या घटनाही घडत आहेत. आतापर्यंत मुंबईत ११ अपघात झाले. त्यातील आठ विद्यार्थ्यांना नाहक जीव गमवावा लागला आहे.‘विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये महिला वॉर्डन असल्याच पाहिजेत’ असे म्हणत उच्च न्यायालयाने राज्य सरकार, परिवहन विभागाचे सचिव आणि परिवहन आयुक्तांना दोन आठवड्यांत या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)