शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

विद्यार्थिनींनी जाणून घेतल्या ‘त्यांच्या’ व्यथा

By admin | Updated: March 11, 2015 00:08 IST

स्वच्छता मोहीम : वेश्या वस्तीत राबविले राष्ट्रीय स्वयंसेवक शिबिर

सांगली : येथील दसरा चौकातील सुंदरनगरमधील वेश्या महिलांच्या घरोघरी जाऊन महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचबरोबर या परिसरात स्वच्छता मोहीम राबवून त्यांच्या घरासमोर रांगोळ्याही काढल्या. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुमारे अडीचशे विद्यार्थी सहभागी झाले होते. कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय (सांगलीवाडी) व राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालयातील राष्ट्रीय स्वयंसेवक शिबिराचे येथील सुंदरनगरमधील वेश्या वस्तीत आयोजन करण्यात आले होते. सकाळी अकरापासून सुमारे अडीचशे विद्यार्थी, विद्यार्थिनींनी या महिलांच्या घरात जाऊन त्यांच्या आरोग्याच्या, आर्थिक व कौटुंबिक समस्या जाणून घेतल्या. त्याच्या निराकरणासाठी उपाययोजनाही सुचवल्या. त्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगण्यात आले. या परिसराची स्वच्छता करून प्रत्येक घरासमोर सुबक रांगोळ्याही विद्यार्थिनींनी काढल्या. यावेळी महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येऊन त्यांच्यावर औषधोपचारही करण्यात आले. या ठिकाणी विद्यार्थिनींनी सुमारे पाच तास श्रमदानही केले. शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणेम्हणून महापौर विवेक कांबळे, पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे, शिक्षणाधिकारी नीशा वाघमोडे, नगरसेविका अनारकली कुरणे, ज्योती अदाटे उपस्थित होते.वेश्या महिला एड्स निर्मूलन केंद्राच्या अध्यक्षा अमिराबी शेख (बंदव्वा) यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सचिव दीपक चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सर्वांनी वेश्या महिलांच्या पुनर्वसनासाठी सर्व ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या वस्तीत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा, साफसफाई करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थी प्रतिनिधी वैभव चौगुले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)तेरा मुलांना दिले माझे नाव : विवेक कांबळेयावेळी महापौर कांबळे म्हणाले की, या महिलांच्या समस्या आपण सर्वात जवळून अनुभवल्या आहेत. घरातून बाहेर काढल्यानंतर याच वस्तीत आपण वाढलो. या महिलांच्या मुलांना पित्याचे नाव नसल्यामुळे समाजात वावरताना त्यांना खूप अवहेलना सहन कराव्या लागतात. यामुळे आजपर्यंत आपण अशा तेरा मुलांना आपले नाव दिले आहे. आज ही तेराही मुले उच्चपदस्थ अधिकारी आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे, याचा आपल्याला अभिमान आहे.