शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी जाणून घेतली जर्मन संस्कृती

By admin | Updated: May 18, 2016 02:08 IST

येथील २२ विद्यार्थ्यांनी जर्मनी या देशाचा अभ्यासदौरा यशस्वीरीत्या पूर्ण केला. याद्वारे विद्यार्थ्यांनी जर्मन संस्कृती जवळून जाणून घेतली.

तळेगाव दाभाडे : येथील २२ विद्यार्थ्यांनी जर्मनी या देशाचा अभ्यासदौरा यशस्वीरीत्या पूर्ण केला. याद्वारे विद्यार्थ्यांनी जर्मन संस्कृती जवळून जाणून घेतली. येथील फार्शश्पिलॅन अकादमीच्या संचालिका रुचा वळवडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी जर्मन दौऱ्यासाठी गेले होते. तळेगावसारख्या ठिकाणी राहून त्या गेली १६ वर्षे जर्मन भाषा शिकवत आहेत. परदेशी भाषा शिकवणाऱ्यांना त्या देशात जाऊन तिथली संस्कृती जाणून घ्यावी, असे नक्कीच वाटते. म्हणूनच या दौऱ्याचे नियोजन केले होते. जर्मनी, स्वित्झर्लंड, आॅस्ट्रिया व फ्रान्स या चार देशांमध्ये हा अभ्यासदौरा झाला.तेथील संस्कृतीची मुलांना ओळख व्हावी, तसेच आपल्या भारताचे नागरिकत्व या संकुचित दृष्टिकोनातून जागतिक नागरिकत्व या विचाराकडे मुलांची वाटचाल व्हावी हा मुख्य उद्देश होता. जर्मनीमध्ये चर्च, तिथली विद्यापीठे, शाळा, संसदभवन, टेलिव्हिजन टॉवर येथे ही मुले गेली होती. म्युनशेन शहरातले लेक कॉन्स्टान्स रिजन हे प्रचंड मोठे तळे पाहायला मिळाले. मुलांना तेथील कुटुंबांमध्ये राहण्याची संधीदेखील मिळाली. युरोपीय देशांतदेखील एकत्र कुटुंबपद्धती आहे, हे यामुळे मुलांना अनुभवता आले. प्रा. शिरीष अवधानी, गणेश बिडकर, रोहिणी दामले, श्रीनिवास पेंडसे, डॉ. सविता केळकर यांनी मार्गदर्शन केले. श्रीधर वळवडे यांचे सहकार्य लाभले. वळवडे यांनी सांगितले, ‘‘या दौऱ्यात एकुलत्या मुलांची संख्या जास्त होती. या दौऱ्यामुळे त्यांना शेअरिंग करण्याची चांगली सवय लागली आहे. हा अभ्यास दौरा जर्मन भाषा शिकणाऱ्यांसाठी व न शिकणाऱ्यांसाठी अनोखा अभ्यासक्रमच होता. सार्वजनिक स्वच्छता हे मूल्य या दौऱ्यात त्यांच्या अंगी रुजले आहे. नियोजन करून वेळेत काम पूर्ण करणे, आपली ध्येये उंचावणे या सगळ्या गोष्टी मुले शिकली. या दौऱ्यानंतर दर वर्षी अशा अभ्यास दौऱ्याचे नियोजन करण्याची इच्छा आहे. तसेच एक्स्चेंज प्रोग्रॅममध्ये तिथली मुले तळेगावमधल्या कुटुंबात येऊन राहतील, असा प्रयत्नदेखील करणार आहे.’’ (वार्ताहर)