शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआय संपामध्ये विद्यार्थ्यांचीही उडी

By admin | Updated: January 14, 2016 02:25 IST

राज्यातील अशासकीय आयटीआयमधील प्राचार्य आणि कर्मचारी संघटनेने वेतन अनुदानासाठी पुकारलेल्या संपाला आयटीआय विद्यार्थी संघटनेनेही पाठिंबा दिला आहे.

मुंबई : राज्यातील अशासकीय आयटीआयमधील प्राचार्य आणि कर्मचारी संघटनेने वेतन अनुदानासाठी पुकारलेल्या संपाला आयटीआय विद्यार्थी संघटनेनेही पाठिंबा दिला आहे. मंगळवारी निफाडमध्ये मोर्चा काढल्यानंतर राज्यभर मोर्चे काढून विद्यार्थी संघटना शिक्षकांच्या मागणीला पाठिंबा देणार आहेत.आयटीआय विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष निखिल मोरे यांनी सांगितले की, अशासकीय आयटीआयला वेतन अनुदान मिळाले तर विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्कात कपात होईल. त्यामुळे वेतन अनुदानाचा अप्रत्यक्ष फायदा विद्यार्थ्यांनाही होणार आहे. वेतन अनुदानाअभावी बरेच अशासकीय आयटीआय बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शासकीय आयटीआयमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांची ससेहोलपट होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यामुळे शिक्षक, प्राचार्य व कर्मचाऱ्यांना मोठे पाठबळ मिळाल्याची प्रतिक्रिया अशासकीय आयटीआय प्राचार्य, कर्मचारी संघटनेने दिली. मात्र प्रशासनाकडून आंदोलन चिरडण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले की, जिल्हास्तरावर मोर्चे काढण्यासाठी पोलीस आणि विद्यापीठ प्रशासन परवानगी देत नाही आहेत. तर आझाद मैदानात बेमुदत उपोषण आणि धरणे आंदोलन करणाऱ्या प्राचार्य आणि शिक्षकांना रविवारी आझाद मैदानात उपोषणास बसता येणार नाही, असे पोलिसांनी बजावले आहे. मात्र कितीही दबाव टाकला, तरी आंदोलन मागे घेणार नसल्याचा निश्चय संघटनेने केल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)जळगाव-नाशिकमध्ये पाठिंबागरीब विद्यार्थ्यांना चांगले प्रशिक्षण देण्यासाठी अशासकीय आयटीआय मजबूत होण्याची गरज आहे. त्यासाठी विद्यार्थी शनिवारी जळगाव आणि बुधवारी नाशिकमध्ये मोर्चा काढून संघटना शिक्षकांना पाठिंबा देणार आहे.