शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

‘कटआॅफ’मुळे विद्यार्थ्यांची फसगत

By admin | Updated: June 28, 2016 00:41 IST

खासगी कोचिंग क्लासेसशी असलेल्या छुप्या करारामुळे अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थी सोयी-सुविधा, शिक्षक नसलेल्या कॉलेजमध्येही प्रवेश घेतात.

पुणे : खासगी कोचिंग क्लासेसशी असलेल्या छुप्या करारामुळे अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थी सोयी-सुविधा, शिक्षक नसलेल्या कॉलेजमध्येही प्रवेश घेतात. त्यामुळे या कॉलेजचा कटआॅफ आपोआप वाढत आहे. परिणामी पुढील वर्षी हाच कटआॅफ पाहून अनेक विद्यार्थी या कॉलेजला पसंती देतात. यंदाही अशाच काही कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्याने त्यांची फसगत झाली आहे. प्रत्यक्ष कॉलेजमध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर खरी परिस्थिती येत आहे. मागील वर्षी अशाप्रकारच्या अनेक तक्रारी विद्यार्थ्यांकडून होऊनही केंद्रीय प्रवेश समितीने यंदा त्याबाबत कोणतेही पाऊल उचललेले नाही.केंद्रीय प्रवेश समितीने सोमवारी अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली. त्यानुसार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी सुरुवात केली. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून पुणे व पिंपरी-चिंचवडमधील २१८ कॉलेजमधील ५० कॉलेजेसचे पसंतीक्रम भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. पसंतीक्रम भरत असताना विद्यार्थी केवळ संबंंधित कॉलेजचा मागील वर्षीचे कटआॅफ गुण पाहतात. त्यानुसार आपल्याला मिळालेल्या गुणांशी तुलना करून पसंतीक्रम देतात. केंद्रीय प्रवेश समितीकडून दिलेल्या माहिती पुस्तकातही केवळ संबंधित कॉलेजचे मागील वर्षीचे कटआॅफ, शुल्क व इतर माहिती देण्यात आली आहे. मात्र, त्यामध्ये कॉलेजमध्ये असलेल्या सुविधा, शिक्षक, ग्रंथालय, प्रयोगशाळा, क्रीडांगण तसेच इतर माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुरुवातीला याबाबत माहितीच होत नाही. अनेक विद्यार्थी साधारणपणे कटआॅफ व नामांकित कॉलेजला अधिक पसंती देतात. त्यानुसार पसंती क्रम भरले जातात. मात्र, इथेच विद्यार्थ्यांची फसगत होत आहे. शहरातील काही महाविद्यालयांनी खासगी कोचिंग क्लासेसशी छुपा करार केलेला आहे. या करारानुसार क्लासेसमधील विद्यार्थ्यांना संबंंधित महाविद्यालयात ७५ टक्के हजेरी तसेच प्रात्यक्षिकांमधून सवलत मिळते. त्यामुळे अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थी या कॉलेजला पसंती देतात. तसेच काही कॉलेज विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी आधीपासूनच हजरीतून सवलत, प्रात्यक्षिकांमध्ये वाढीव गुण देण्याचे अमिष दाखवतात. त्यामुळे चांगले गुण मिळालेले विद्यार्थी या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यास उत्सुक असतात. शिक्षकांची अपुरी संख्या तसेच इतर आवश्यक सुविधा नसलेल्या कॉलेजचे कटआॅफही इतर नामांकित कॉलेजच्या कटआॅफच्या जवळपास असते. यावर्षीच्या गुणवत्ता यादीतही ही स्थिती दिसून आली आहे.