शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड

By admin | Updated: July 6, 2016 20:09 IST

राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत सुरू असलेल्या शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळत

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ६ : राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत सुरू असलेल्या शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. राज्यातीलशासकीय आणि खाजगी आयटीआयमधील १ लाख ३२ हजार जागांसाठी अवघे १० दिवस पूर्ण होण्याआधीच ३ लाख ७९ हजार ६३८ रजिस्ट्रेशन क्रमांक तयार करण्यात आले आहेत. याचाच अर्थ सरासरी एका जागेसाठी ३ रजिस्ट्रेशन क्रमांक तयारकरण्यात आले आहेत.यंदाही राज्यात आॅनलाईन पद्धतीने आयटीआय प्रवेश प्रक्रिया पार पडत आहे. २७ जून २०१६ रोजी सुरू झालेल्या प्रवेश प्रक्रियेत बुधवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ३ लाख ७९ हजार ६३८ रजिस्ट्रेशन क्रमांक तयार करण्यात आले होते. त्यांपैकी ३ लाख २६ हजार ४०९ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज पूर्णपणे भरले आहेत, तर २ लाख १५ हजार ९२५ विद्यार्थ्यांनी प्रवेश शुल्क भरूनआॅनलाईन प्रवेश प्रक्रियेतील स्थान निश्चित केले आहे. याचाच अर्थ सरासरी २ जागांसाठी ३ विद्यार्थ्यांचे अर्ज निश्चित झाले आहेत. तर रजिस्ट्रेशन क्रमांकाची संख्या पाहता सरासरी एका जागेसाठी तीन रजिस्ट्रेशन क्रमांक तयार झालेले आहेत.एकीकडे पॉलिटेक्निक प्रवेशाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली असताना, आयटीआय प्रवेशाला मिळणारा प्रतिसाद पाहता आश्चर्य व्यक्त होत आहे.आयटीआयचा समावेश कौशल्य विकास व उद्योजकता विभागात केल्याने हा प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा आहे. मात्र दुसरीकडे पॉलिटेक्निक प्रवेशाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याने तंत्रशिक्षण संचालनालयाची डोकेदुखी वाढलीआहे...................................................१० जुलैला मुदत संपणारआॅनलाईन प्रवेश अर्ज करण्याची मुदत १० जुलै रोजी संपत आहे. ११ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करून पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य देणे बंधनकारक आहे. १२ जुलैला सकाळी ११ वाजता प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. तर १४ जुलैला सकाळी ११ वाजता प्रवेशाची पहिली प्रवेश फेरी पार पडणार आहे. त्यानंतर २० जुलैला दुसरी प्रवेश फेरी, २९ जुलैला तिसरी प्रवेश फेरी, ६ आॅगस्टला चौथी प्रवेश फेरी आणि १ आॅगस्टला जिल्हास्तरीय समुपदेशन फेरी म्हणजेच पाचवी प्रवेश फेरी पार पडेल. त्यासोबतच १ आॅगस्टला सकाळी ८ वाजेपासून १७ आॅगस्ट सायंकाळी ५ वाजेपर्यंत संस्थास्तरीय समुपदेशनाची सहावी प्रवेश फेरी पार पडणार आहे.