शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या अपहरणकर्त्यांच्या जीपखाली चिरडून विद्यार्थ्याचा मृत्यू

By admin | Updated: October 21, 2016 01:39 IST

महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीला पळवून नेत असलेल्या अपहरणकर्त्यांच्या जीपखाली चिरडून दहावीतील विद्यार्थी जागीच ठार झाल्याची घटना तालुक्यातील

नाशिक : महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीला पळवून नेत असलेल्या अपहरणकर्त्यांच्या जीपखाली चिरडून दहावीतील विद्यार्थी जागीच ठार झाल्याची घटना तालुक्यातील तळवाडे दिगर येथे घडली. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने विद्यार्थिनीची सुटका करून अपहरणकर्त्यांना चोप देत त्यांचे वाहन पेटविले. गुरुवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने तालुका हादरला असून संशयितांना जेरबंद करण्यात आले आहे. बागलाण तालुक्यातील तळवाडे दिगर येथील विद्यार्थिनी बहिणीसह सकाळी सात वाजताच्या सुमारास महाविद्यालयात जात होती. या वेळी बोलेरो जीपमधून आलेल्या चार तरुणांनी दोघींना गाडीत ओढले. मात्र यातील एकीने अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत आरडाओरड सुरू केली. सुटका झालेल्या विद्यार्थिनीने सर्व प्रकार जमलेल्या ग्रामस्थांना सांगितला. संतप्त ग्रामस्थांनी जीपचा पाठलाग सुरू केला. त्यामुळे अपहरणकर्त्यांनी जीप भरधाव पळविण्याच्या प्रयत्नात किकवारी खुर्द नजीक यज्ञेश रघुनाथ काकुळते (१६) या दहावीतील विद्यार्थ्याला चिरडले. त्यात यज्ञेश जागीच ठार झाला. तसेच चालकाचा ताबा सुटून जीप झाडावर आदळली. त्यानंतर संतप्त जमावाने अपहृत तरुणीची सुटका करत अपहरणकर्त्यांना चोप दिला आणि येथील एका कार्यालयात डांबून ठेवत पोलिसांना बोलावले. तसेच बोलेरो गाडीची जाळपोळही केली.यज्ञेशच्या नातेवाईक महिलांनी पोलीस ठाण्यासमोर एक तास ठिय्या आंदोलन केले. (प्रतिनिधी)