शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
3
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
4
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
5
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
6
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
7
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
8
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
9
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
10
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
11
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
12
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
13
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
14
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
15
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
16
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
17
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
18
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
19
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
20
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...

विद्यार्थ्यांचा दिवस पाण्यात..

By admin | Updated: July 22, 2014 00:58 IST

‘फार्मसी’अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी भरपावसात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासमोर जोरदार आंदोलन केले. पुरवणी परीक्षा सुरू करण्यात यावी, ही त्यांची प्रमुख मागणी होती.

नागपूर विद्यापीठ : पुरवणी परीक्षा घेण्याची ‘फार्मसी’च्या विद्यार्थ्यांची मागणीनागपूर : ‘फार्मसी’अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी भरपावसात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासमोर जोरदार आंदोलन केले. पुरवणी परीक्षा सुरू करण्यात यावी, ही त्यांची प्रमुख मागणी होती. या मागणीवर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन प्र-कुलगुरूंनी दिल्यानंतरच विद्यार्थ्यांनी सुमारे पाच तास चाललेले आंदोलन मागे घेतले.बी.फार्म. अभ्यासक्रमात अंतिम वर्षात उत्तीर्ण झालेल्या परंतु यापूर्वीच्या वर्षात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी मिळावी, यासाठी ‘पुरवणी’ ही परीक्षा विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येते. मागील वर्षीच ही परीक्षा बंद करण्यात आली होती. परंतु विद्यार्थ्यांच्या मोठ्या आंदोलनानंतर विद्यापीठाने अखेरची संधी दिली होती व पुढील वर्षीपासून ‘पुरवणी’ परीक्षा घेतली जाणार नाही, असे स्पष्ट केले होते.यंदा तृतीय वर्षाला शिक्षण घेणाऱ्या जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेच्या सोयीपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदादेखील पुरवणी परीक्षा घेण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठावर धडक मोर्चा नेला. सुमारे १०० विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या प्रवेश द्वारासमोरच घोषणाबाजी सुरू केली. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, याकरिता पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.दरम्यान, प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या मागणीवर सकारात्मक विचार करण्यात येईल व २८ जुलैपर्यंत तोडगा काढण्याचे आश्वासन प्र-कुलगुरूंनी दिले. त्यानंतरच विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. जर विद्यापीठाने दिलेल्या मुदतीत तोडगा काढला नाही तर परत जोरदार आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.(प्रतिनिधी)