शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कागदपत्रे तपासणीत विद्यार्थी उदासीन

By admin | Updated: June 10, 2017 03:12 IST

अकरावी इयत्तेच्या प्रवेशासाठी आॅनलाइन नोंदणी प्रक्रियेस सुरुवात झाली असून, सुमारे ८५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी शुक्रवारपर्यंत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावी इयत्तेच्या प्रवेशासाठी आॅनलाइन नोंदणी प्रक्रियेस सुरुवात झाली असून, सुमारे ८५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी शुक्रवारपर्यंत अर्जाचा पहिला भाग भरलेला आहे. मात्र या अर्जात कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या ९० टक्के विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज मंजूर होण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची तपासणी केलेली नाही. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना अर्जाचा निकाल लागल्यानंतर अर्जाचा दुसरा भाग भरता येणार नसल्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सांगतिले.मुंबई महानगर क्षेत्रामधील महाविद्यालयांतील अकरावी आॅनलाइनसाठी एकूण २ लाख ९२ हजार ०९० जागा उपलब्ध आहेत. या जागांमध्ये कला, क्रीडा, शारीरिकदृष्ट्या अपंग, प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त अशा विविध आरक्षणांसह अनुसूचित जाती व जमाती तसेच विशेष व इतर मागास प्रवर्गांसाठी राखीव जागा असतात. या जागांसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना संबंधित सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आणि कागदपत्रांची आवश्यकता असते. ही कागदपत्रे विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतून किंवा मार्गदर्शन केंद्रातून तपासून घ्यावी लागतात. संबंधित कागदपत्रांची खातरजमा केल्यानंतरच अर्जाचा पूर्ण भरलेला पहिला भाग मंजूर केला जातो. त्यामुळे ही प्रक्रिया लांबली आहे.पुढील आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी किमान अकरावी आॅनलाइन प्रक्रिया अर्जाचा पहिला भाग भरणे अपेक्षित आहे. कारण दहावीचा निकाल लागल्यानंतर अर्जाचा दुसरा भाग भरण्यास खुला केला जाईल. अशा परिस्थितीत ज्या विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची तपासणी पूर्ण केली असेल, त्यांनाच तत्काळ अर्जाचा दुसरा भाग भरण्यास परवानगी मिळणार आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी निकालाची प्रतीक्षा न करता तत्काळ कागदपत्रांची तपासणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.