शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे अद्याप समायोजन नाही

By admin | Updated: November 8, 2016 04:57 IST

अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पाळा येथील आदिवासी आश्रमशाळेची मान्यता तात्काळ रद्द करण्यात आली.

गणेश मापारी, खामगाव (जि. बुलडाणा)अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पाळा येथील आदिवासी आश्रमशाळेची मान्यता तात्काळ रद्द करण्यात आली. मात्र शाळेतील ३८८ विद्यार्थ्यांचे अद्याप दुसऱ्या शाळेमध्ये समायोजन करण्यात आलेले नाही. दिवाळीच्या सुटीनंतर बुधवारी शाळा सुरू होणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.या प्रकरणात १७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून १५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकासह शिक्षक व शिक्षकेत्तर ८ कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून सोमवारीही आणखी दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. दोषींना निलंबित करण्यासोबत या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे विविध आदिवासी शाळांमध्ये त्वरित समायोजन करण्यात येईल, असे आश्वासन आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी दिले होते. मात्र समायोजनासाठी दुसरी शाळाही अद्याप निश्चित झालेली नाही. त्यामुळे ३८८ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या मूळ गावी वेगवेगळी पथके पाठविली असून विद्यार्थ्यांच्या पसंतीनुसार त्यांचे आदिवासी शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. या प्रक्रियेला बराच अवधी लागण्याची शक्यता आहे.