शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात दुर्लक्षामुळेच विद्यार्थ्यांना विषबाधा !

By admin | Updated: January 5, 2015 04:26 IST

अस्वच्छ स्वयंपाकगृह, दूषित पाणीपुरवठा, खराब तांदूळ याकडे कोर्टीच्या शिवाजी विद्यालयाच्या शालेय पोषण आहार समितीच्या

करमाळा : अस्वच्छ स्वयंपाकगृह, दूषित पाणीपुरवठा, खराब तांदूळ याकडे कोर्टीच्या शिवाजी विद्यालयाच्या शालेय पोषण आहार समितीच्या व्यवस्थापनाने दुर्लक्ष केल्यानेच तब्बल ११५ विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याची दुर्घटना घडली आहे, अशी फिर्याद गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर मुख्याध्यापकासह माध्यान्ह भोजन तयार करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.विद्यार्थी विषबाधा प्रकरणी दिलेल्या फिर्यादीत गटशिक्षणाधिकारी सुलभा वटारे यांनी म्हटले आहे की, माध्यान्ह भोजन बनविलेले ठिकाण, धान्याची पाहणी केली असता ही ठिकाणे अस्वच्छ असल्याचे आढळले. तांदळाला उग्रवास येत होता तर इतर कडधान्यात थोडीशी पांढरी भुकटी दिसून आली. बनविण्यात आलेल्या भातासही उग्र्र वास येत होता. अन्न बनविण्यासाठी ज्या टाकीतून पाणी वापरले जाते त्याची पाहणी केली असता टाकीच्या तळाशी शेवाळे तसेच कापडाच्या चिंध्या कुजलेल्या अवस्थेत दिसून आल्या. याला विद्यालयाचे मुख्याध्यापक व स्वयंपाकी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक छगन रामभाऊ माने व अन्न शिजवणारे गणेश जालिंदर अभंग, अश्विन गणेश अभंग, काशीबाई गणेश अभंग यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेतले आहे.