शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना आता आॅफलाइनचाही मार्ग

By admin | Updated: July 11, 2015 02:44 IST

आॅनलाइन पद्धतीने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आॅफलाइन प्रक्रियेत सामील होता येणार नाही, असा फतवा शिक्षण विभागाने काढला होता. मात्र तो रद्द केल्याचे

मुंबई : आॅनलाइन पद्धतीने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आॅफलाइन प्रक्रियेत सामील होता येणार नाही, असा फतवा शिक्षण विभागाने काढला होता. मात्र तो रद्द केल्याचे टिष्ट्वट शुक्रवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे.यासंदर्भात मुंबई विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक भीमराव फडतरे म्हणाले, की नियमानुसार अकरावी आॅनलाइन पद्धतीने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आॅफलाइन पद्धतीने प्रवेश देण्यात येणार नव्हता. त्यासाठी प्रवेश रद्द करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांमागे शिक्का मारण्याचे आदेशही दिले होते. आॅनलाइन प्रक्रियेत सामील न झालेल्या विद्यार्थ्यांना आणि आॅनलाइन पद्धतीत प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आॅफलाइन पद्धतीने प्रवेश देण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र या नियमात बदल झाल्याची माहिती शुक्रवारी शिक्षण विभागाने कळवली. तिसऱ्या आॅनलाइन कट आॅफ लिस्टनंतरही महानगर क्षेत्रातील ८०,२९० जागा रिक्त राहिल्या आहेत, तर केवळ पाच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे आॅफलाइन प्रवेशानंतर रिक्त जागांमधील कितपत जागा भरतील यात शंकाच आहे. मात्र आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नसलेल्यांना आॅफलाइन प्रवेशामुळे बेटरमेंटची संधी मिळणार आहे.------------शाखानिहाय रिक्त जागाआटर््स - १९ हजार ४०३कॉमर्स - ४० हजार ६२७सायन्स - २० हजार २६०एकूण - ८० हजार २९०--------------आॅफलाइनचे वेळापत्रककनिष्ठ महाविद्यालयाने रिक्त जागांची माहिती शनिवारी ११ जुलै रोजी दुपारी १ वाजता दर्शनी भागावर प्रसिद्ध करावी.शाळा सोडल्याचा मूळ दाखला व गुणपत्रिका आहे अशा विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज द्यावे.   अर्जाचे वितरण व संकलन १३ ते १५ जुलैदरम्यान करावे.शाखानिहाय गुणवत्ता यादी १६ जुलैला सकाळी ११ वाजता प्रसिद्ध होईल.यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांनी १६ जुलैला सायंकाळी ५ वाजेपर्यंत आणि १७ जुलैला प्रवेश घ्यावेत.१८ जुलैला रिक्त जागांचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला सादर करावा.