शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
2
Video: चीनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
3
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
4
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
5
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
6
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
7
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
8
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
9
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
10
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
11
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
12
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
13
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
15
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
16
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
17
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
18
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
19
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
20
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 

गणवेश व पुस्तकांसाठी विद्यार्थ्याची आत्महत्या

By admin | Updated: November 23, 2015 01:37 IST

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याने केवळ गणवेश व पुस्तकांसाठी आत्महत्या केल्याने दुष्काळाची दाहकता पुन्हा ठसठशीतपणे अधोरेखित.

रिधोरा (अकोला): दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच असून, रविवारी एका शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याने केवळ गणवेश व पुस्तकांसाठी आत्महत्या केल्याने, दुष्काळाची दाहकता ठसठशीतपणे अधोरेखित झाली. सततच्या नापिकीमुळे आपल्या शिक्षणासाठीही कुटुंबाकडे पैसे नसल्याचे पाहून, चिंतातूर झालेल्या बाळापूर तालुक्यातील या नववीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आणि पंचक्रोशीत खळबळ उडाली. बाळापूर तालुक्यातील दधम येथे विश्‍वनाथ खुळे हे पत्नी व दोन मुलांसह राहतात. मोठा मुलगा वैभव हा इयत्ता अकरावीत शिकत असून, लहान मुलगा विशाल हा अकोला येथील महाराणा प्रताप विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिकत होता. खुळे कुटुंबाकडे दोन एकर शेती आहे. गतवर्षी त्यांना नापिकी झाली. त्यामुळे यंदा त्यांनी खरीप हंगामातील पिके घेण्यासाठी कंबर कसली. संपूर्ण कुटुंब शेतात राबले, सोयाबीन पेरले; मात्र यंदाही निसर्गाच्या लहरीपणाचा फटका पिकाला बसला. मशागत व लागवडीचा खर्चही निघाला नाही. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच आर्थिक संकटात सापडले. अशा स्थितीत आपल्या शिक्षणासाठी पैशांची जुळवाजुळव कशी होईल, आपले शिक्षण कसे पूर्ण होईल, या विवंचनेतून विशालला नैराश्य आले. या नैराश्यातून त्याने रविवारी सकाळी विषारी औषध प्राशन केले. ही बाब त्याच्या कुटुंबीयाच्या लक्षात येताच त्याला उपचारासाठी तत्काळ अकोला येथे रवाना करण्यात आले; मात्र वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली.

*विशाल अभ्यासात होता हुशार!

आत्महत्या केलेला विद्यार्थी विशाल खुळे हा अभ्यासात हुशार होता. काही दिवसांपासून तो आजारी होता, असेही काही ग्रामस्थांनी सांगितले. नापिकीमुळे उत्सवांवर विरजण खुळे कुटुंबीय सतत दोन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करीत आहे. नापिकीमुळे जवळ पैसा नाही. त्यामुळे दसरा, दिवाळीसारखे सणही ते साजरे करू शकले नाही. मुलांच्या शिक्षणासाठी पैसा कोठून आणावा, हा प्रश्न त्यांना भेडसावत होता.

**गणवेशासाठी हट्ट

      विशालने दिवाळीपूर्वीपासूनच गणवेश आणि पाठय़पुस्तकांसाठी हट्ट धरला होता; मात्र पैसेच नसल्याने त्याचा हट्ट पूर्ण होत नव्हता. त्याला काही पुस्तके मिळाली होती. उर्वरित पुस्तकांसाठी त्याचा आग्रह कायम होता.

***बॅँकेचे ४0 हजार रुपयांचे कर्ज

    विशालचे वडील विश्‍वनाथ खुळे यांनी शेतीसाठी जिल्हा मध्यवर्ती बॅँकेकडून ४0 हजार रुपयांचे कर्ज काढले; मात्र सततच्या नापिकीमुळे कर्ज फेडता आलेले नाही.