शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीत प्रवेश न मिळाल्यामुळे विद्यार्थिनीची आत्महत्या

By admin | Updated: July 26, 2016 01:56 IST

खासगी संस्थांकडून डोनेशनची मागणी; गरिबीमुळे केली आत्महत्या.

जानेफळ (जि. बुलडाणा) : दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे अकरावीत प्रवेश मिळत नसल्याने शिक्षणापासून वंचित रहावे लागणार, या नैराश्यापोटी घाटनांद्रा ता. मेहकर येथील एका विद्यार्थिनीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ही घटना घडली. जया विजय राठोड असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे. जया खामगाव येथून दहावी उत्तीर्ण झाली होती. मात्र, तिला ४५ टक्के गुण मिळाले होते. कमी गुण मिळाले, तरीही जयाला पुढे शिकण्याची जिद्द होती व तसे तिने वडिलांना सांगितले होते. त्यामुळे विजय राठोड यांनी तिच्या अकरावीच्या प्रवेशासाठी प्रयत्न सुरू केले. अनेक महाविद्यालयांच्या पायर्‍या झिजवूनही गुण कमी असल्याने तिला प्रवेश मिळण्यात अडचणी येत होत्या. अनेक महाविद्यालयांनी त्यांना डोनेशनही मागितल्याची माहिती आहे; परंतु आर्थिक क्षमता नसल्याने राठोड महाविद्यालयांची डोनेशनची अट पूर्ण करू शकले नाहीत.वडिलांची होणारी फरपट पाहून व आता शिक्षणापासून वंचित राहावे लागणार, यामुळे जया निराश झाली होती. या नैराश्यातूनच अखेर २५ जुलै रोजी सकाळी घरातील सर्व जण झोपेत असताना घराशेजारच्या विहिरीत तिने आत्महत्या केली. केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहण्याच्या भीतीने जयाने आत्महत्या केली. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गरिबीने घेतला बळी!एसटी बसची पास काढण्यासाठी वडिलांकडे पैसे नसल्यामुळे मागील वर्षी एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. अशीच काहीशी घाटनांद्रा येथील ही घटना आहे. मृतक जया राठोड हिचे वडील अल्पभूूधारक आहेत. मागील दोन वर्षांपासून नापिकीमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. मागील वर्षी पेरणीसाठी काढलेले बँकेचे ५0 हजार रुपये कर्ज डोक्यावर आहे. यावर्षी सुद्धा पेरणीसाठी उसणवारी करावी लागली. त्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे विजय राठोड यांना मुलीच्या शिक्षणाला पूर्णविराम द्यावा लागणार होता. मुलींच्या शिक्षणावर शासन कोट्यवधी रुपये खर्च करते. तरीही गरिबीमुळे अनेक मुली शिक्षणापासून वंचित राहत आहेत. याच गरिबीमुळे आज पुन्हा एका सावित्रीला आपली जीवनयात्रा संपवावी लागली.