शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी सायबर गुन्हेगारीत

By admin | Updated: May 18, 2015 03:48 IST

सायबर गुन्हेगारीचे लोण आता तरुणांपुरते मर्यादित राहिले नसून माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील विद्यार्थीही त्यात अडकू लागले आहेत.

वीरेंद्रकुमार जोगी, नागपूरसायबर गुन्हेगारीचे लोण आता तरुणांपुरते मर्यादित राहिले नसून माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील विद्यार्थीही त्यात अडकू लागले आहेत. १८ वर्षांखालील अल्पवयीन गुन्हेगारांवर कोणत्या नियमानुसार कारवाई करावी याबाबत कोणतीही तरतूद माहिती तंत्रज्ञान कायद्यात नाही. सायबर गुन्हेगारीत आरोपी म्हणून १८ वर्षांहून कमी वय असलेल्यांचा जरी समावेश असला तरी देखील त्यांच्यावर कारवाई करण्यातच आली नसल्याचे धक्कादायक वास्तव इंडियन सायबर आर्मीने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. सोशल मीडियावर भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. भारतात २०१४ साली २ कोटी ४३ लाख इंटरनेट युजर्स होते, त्यापैकी १ कोटी ६ लाख वापरकर्ते दररोज सोशल मीडियाचा वापर करीत असल्याचे समोर आले. स्मार्ट फोन वापरणाऱ्यांना सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह राहणे सोपे झाले आहे. आयटी अ‍ॅक्ट २००० नुसार कोणत्याही सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह होण्यासाठी किमान वय १८ वर्षे आहे. मात्र आॅपरेटर्स १३ वर्षे पूर्ण झालेल्या कोणत्याही व्यक्तीला सोशल मीडियावर अकाऊंट उघडण्यास परवानगी देते. सर्वांत जास्त सायबर गुन्हेगार १८ ते ३० वयोगटातील असल्याचेही अहवालातून समोर आले आहे. सोशल मीडिया वापराबाबतचे कायदे व सोशल मीडिया आॅपरेटर्सचे नियम वेगवेगळे असल्याने एक नवीनच सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. स्क्रिप्ट किडिंगसोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून अधिकाधिक मित्र करता यावेत यासाठी पासवर्ड कसा ब्रेक करावा याचे धडे विद्यार्थी मिळवित असतात. अनेक सर्च इंजिनवर ही माहिती उपलब्ध आहे. यामुळे माहिती मिळवून पासवर्ड ब्रेक करणे सोपे होते. पासवर्ड ब्रेक झाल्याने ते अकाऊंट सर्वांसाठी खुले होते व सहजपणे हाताळता येते. या पद्धतीला ‘स्क्रिप्ट किडिंग’ म्हटले जाते. भारतात यावर पूर्णत: बंदी आहे. भारतीय आयटी अ‍ॅक्ट २००० नुसार सोशल मीडियावर वापर करणाऱ्याचे वय कमीत कमी १८ वर्षे असावे. आॅपरेटर्सच्या नियमावलीनुसार सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह होण्याचे वय हे त्यातुलनेत साधारणपणे पाच वर्षांनी कमी आहे. नियम सर्वत्र सारखे हवेलॅपटॉप, स्मार्टफोनच्या वापर वाढल्याने सायबर गुन्हे वाढले आहे. स्मार्टफोनवरून सोशल मीडियाचा वापर वाढल्याने ते सहजतेने हॅक करता येते. जगात इंटरनेट सर्वत्र सारख्याच पद्धतीने वापरले जात असल्याने त्याचे नियमही सारखे असावेत, अशी माहिती इंडियन सायबर आर्मीचे संचालक अमेय बावणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.