शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

‘एमपीएससी’ पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थ्यांची मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 02:53 IST

काही परीक्षार्थींचा कोरोनामुळे मृत्यू; ११ एप्रिलला ८०६ जागांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा

पिंपरी (पुणे) : कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलावी, अशी जोरदार मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. समाजमाध्यम आणि सरकारकडे निवेदनाद्वारे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे.एमपीएससीतर्फे येत्या ११ एप्रिल रोजी ८०६ जागांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. राज्यात कोरोना बधितांची संख्या वाढत आहे. अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली असून, काहींचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेश, बिहारने विविध खात्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. केंद्रीय जल मार्ग विभागाने नॅव्हिगेशनल असिस्टंट व टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक) पदाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांची मानसिकता परीक्षा पुढे ढकलण्याची असल्याचे निवेदन एमपीएससी समन्वय समितीने राज्य सरकारला दिले आहे. याशिवाय विद्यार्थ्यांनी समाज माध्यमावर ‘हॅश टॅग पोस्टपोंड एमपीएससी’ अशी मोहीम सुरू केली आहे.मार्चमध्ये झालेल्या परीक्षेनंतर अनेकांना कोरोना झाला. काहींचे आई, वडील, बहीण, आप्त कोरोनाबाधित आहेत. अनेक जण ११ एप्रिलची परीक्षा देता यावी यासाठी अंगावर आजार काढत आहेत. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलावी.- निकिता शिरिते, विद्यार्थीमाझ्या रूममधील एमपीएससीची तयारी करणाऱ्या काही मुली आजारी आहेत. जवळपास तीस टक्के मुले आजारी आहेत. सरकारने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नये. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलावी.- सारिका चोले, विद्यार्थीट्विटर प्रतिक्रियासद्यस्थिती लक्षात घेऊन ११ एप्रिलला होणारी परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी परीक्षार्थी करीत आहेत.- कमलाकर शेटेराज्यात तीस टक्के विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आयोगाचा परीक्षा घेण्याचा अट्टाहास आमचे व आमच्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात टाकू शकतो. -दीपेश मोरे, विद्यार्थी 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा