शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्यांना अटक

By admin | Updated: January 17, 2017 01:39 IST

आळेफाटा पोलिसांनी ग्राहक बनून सापळा रचत रंगेहाथ पकडल्याची घटना पुणे-नाशिक महामार्गावर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील आळेखिंडी येथे घडली

आळेफाटा : बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्यास आळेफाटा पोलिसांनी ग्राहक बनून सापळा रचत रंगेहाथ पकडल्याची घटना पुणे-नाशिक महामार्गावर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील आळेखिंडी येथे घडली. या कारवाईत पोलिसांनी तीन ते चार लाख रुपये किमतीचे बिबट्याचे कातडे जप्त केले आहे. मात्र या वेळी चारपैकी तिघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आळेफाट्याच्याजवळील आळेखिंडी येथे बिबट्याचे कातडे विक्रीस काही जण आले असल्याची गुप्त माहिती पोलिसांना सोमवारी दुपारी दोनच्या वेळेला मिळाली. पोलिसांनी ग्राहक बनून संबंधितांशी संपर्क साधाला असता त्यांनी आळेखिंडी येथे येण्याचे सांगितले. आळेफाटा पोलीस ठाण्याचे नीलेश कारखिले व महेश काठमोरे आळेखिंडी येथे गेले व चार जणांनी तेथील जंगलात लपवून ठेवलेले बिबट्याचे कातडे आणले. या बिबट्याच्या कातड्याची चार लाख रुपये किंमत देण्याची मागणी करण्यात आली. मात्र याचवेळी पोलिसांनी खाक्या दाखवला. या वेळी झटापट झाली, मात्र तिघे जण पळून गेले. पोलिसांनी एकाला ताब्यात घेत बिबट्याचे कातडे जप्त केले. दरम्यान, पोलिसांनी अधिक चौकशी केली असता ताब्यात घेतलेल्याचे नाव अजय छगन केदार (वय २०, रामकडेबोटा, ता. संगमनेर) आहे. दीपक जाधव व इतर दोघे अशी पळालेल्या आरोपींची नावे असल्याचे समजले. हे सर्व जण शेजारच्या संगमनेर तालुक्यातील बोटा परिसरातील आहेत. याबाबत पोलिसांनी वनविभाग कर्मचारी यांना आळेफाटा पोलीस ठाण्यात बोलावत बिबट्याच्या कातड्याची खातरजमा केली. याबाबत माहिती आळे वनपरिक्षेत्र कार्यालयास देण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.