शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

एसटीत बदलीचे नियम धाब्यावर

By admin | Updated: June 13, 2016 05:21 IST

एसटी महामंडळात कर्मचाऱ्यांच्या विनंती बदलीचे आदेश काढताना नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

सुशांत मोरे,

मुंबई- एसटी महामंडळात कर्मचाऱ्यांच्या विनंती बदलीचे आदेश काढताना नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. अशा ७0६ कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश एप्रिलमध्ये काढण्यात आले असून, ते नियमित करण्यासाठी आता महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत. महामंडळातील कर्मचाऱ्याला गंभीर आजार असल्यास किंवा पती-पत्नीला एकाच ठिकाणी राहता यावे, यासाठी बदलीचा विनंती अर्ज करता येतो. मात्र एसटीत हे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. एप्रिलमध्ये राज्यातील सुमारे ७0६ कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी एसटी महामंडळाकडे विनंती अर्ज केले होते. यामध्ये चालक, वाहक, लिपिक, लेखापाल, वाहतूक निरीक्षक यांचा समावेश होता. या बदल्यांचे आदेश एसटी मुख्यालयातील संबंधित विभागाकडून काढण्यात आले. मात्र हे आदेश काढताना ज्या कार्यालयातून कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली, त्या कार्यालयाला आणि ज्या कार्यालयात बदली झाली त्या कार्यालयाला बदलीच्या आदेशाची प्रतच देण्यात आली नाही.बदली केल्यानंतर आदेशाची प्रत किंवा पत्र दोन्ही संबंधित विभागांना देणे आवश्यक असते, मात्र तसे न करता परस्पर बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे एप्रिलमध्ये बदली आदेश काढल्यानंतरही हे कर्मचारी अद्याप कामावर रुजू होऊ शकलेले नाहीत. संबंधित विभागांना बदलीच्या आदेशाची प्रतच मिळाली नसल्याने त्या विभागातील वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्यास तयार नाहीत. १५ जूनपासून रुजू करून घेण्याचा प्रयत्नयासंदर्भात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांना विचारले असता, संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी यावर चर्चा करण्यात आली आहे. योग्य ती कारवाई केली जाईल. मात्र आता १५ जूनपासून विनंती बदलीचे कर्मचारी कामावर रुजू करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत, असे त्यांनी सांगितले.