शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

१५ मे पासून मासेमारी बंदीला ठाम विरोध

By admin | Updated: May 10, 2014 21:03 IST

शासनाच्या निणर्यानुसार १० जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत वेसावे कोळीवाडयातील मासेमारी बंद राहणार आहे, असे वेसावा नाखवा मंडळाचे अध्यक्ष पृथ्वीराज चंदी यांनी स्पष्ट केले आहे.

१५ मे पासून मासेमारी बंदीला ठाम विरोधमनोहर कुंभेजकर / मुंबई : मासेमारी बंदीसाठी १५ मे पासून काही मच्छीमार संघटनानी आवाज उठविला असला तरी त्याला वेसावकरांनी विरोध दर्शविला आहे. शासनाच्या निणर्यानुसार १० जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत वेसावे कोळीवाडयातील मासेमारी बंद राहणार आहे, असे वेसावा नाखवा मंडळाचे अध्यक्ष पृथ्वीराज चंदी यांनी स्पष्ट केले आहे.पृथ्वीराज चंदी यांनी सांगितले की, वेसावे कोळीवाडयात येथील सुमारे ४०० मासेमारी नौका मालकांची तातडीची सभा झाली. मत्स्यदुष्काळ, डीझेलचा १४-१५ महिने न मिळालेला परतावा, कामगारांची कमतरता, इत्यादी मच्छीमारांसमोर जटील समस्या असून, १५ मे पासून एक महिना अगोदर मासेमारी बंद करणे वेसावकरांना परवडणारे नाही. त्यामुळे या सभेत उपस्थित ४०० मासेमारी नौका मालकांनी १५ मे पासून मासेमारी बंद करण्यास विरोध केला आहे. ९ जूनपर्यंत येथील मासेमारी सुरूच ठेवण्याचा निर्णय या बैठकीत एकमताने घेण्यात घेण्यात आला आहे.शासन निणर्यानुसार ९ जून पर्यंत मासेमारी चालू ठेवण्याची मुभा असताना या निणर्यामध्ये ढवळाढवळ कोणी करू नये. मासेमारी बंदी कालावधी बाबतीत मच्छीमारांशी चर्चा करून शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी वेसावा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष प्रदीप टपके यांनी केली. ठाणे जिल्हा वगळता महाराष्ट्रातील चार सागरी मच्छीमार जिल्‘ातील मच्छीमारांच्या प्रतिनिधीच्या बरोबर चर्चा केली असता त्यांनी सुद्धा १५ मे पासून मासेमारी बंदीला विरोध केल्याचे टपके यांनी स्पष्ट केले.तर परप्रांतीय मच्छीमारी बोटींनी महाराष्ट्रात धूमाकूळ घातला असून त्यांच्या अमर्याद मासेमारीवर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे परप्रांतीय बोटीना महाराष्ट्रात बंदी घालावी, अशी मागणी नाखवा मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र काळे यांनी केली................