शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅट्रॉसिटी’ची कडक अंमलबजावणी होणार

By admin | Updated: December 29, 2016 03:59 IST

लाखोंच्या संख्येने निघालेल्या मराठा मोर्चांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर टाळण्याची मागणी केलेली असताना, राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने बुधवारी या कायद्याची

- यदु जोशी, मुंबई

लाखोंच्या संख्येने निघालेल्या मराठा मोर्चांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर टाळण्याची मागणी केलेली असताना, राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने बुधवारी या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. त्यासाठी प्रत्येक उपविभागीय अधिकारी पातळीवर (एसडीओ) दक्षता व नियंत्रण समिती स्थापन करण्याचेही फर्मान काढले.अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती असायची. आता प्रत्येक उपविभागीय अधिकारी पातळीवर (साधारणत: दोन तालुके मिळून) एक समिती असेल. उपविभागीय अधिकारी समितीचे अध्यक्ष असतील. पोलीस उपअधीक्षक, सर्व तहसीलदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, अनुसूचित जाती-जमातीचे दोन सामाजिक कार्यकर्ते, अनुसूचित जाती-जमातीचे अशासकीय संस्थांचे दोन सामाजिक कार्यकर्ते आणि केंद्र सरकारने नामनिर्देशित केलेले तीन सामाजिक कार्यकर्ते या समितीमध्ये असतील. अशा समित्या स्थापन करण्याची अधिसूचना ८ नोव्हेंबर २०१३ रोजी केंद्रीय सामाजिक न्याय विभागाने काढली होती. राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समिती ही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असते. मुख्यमंत्र्यांनी दिले होते संकेतअ‍ॅट्रॉसिटीचा कायदा शिथिल केला जाणार नाही, उलट त्याची परिणामकारक अंमलबजावणी केली जाईल, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात स्पष्ट केली होती. अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर रोखण्यासाठी खुल्या प्रवर्गातील प्रतिनिधींनादेखील या समित्यांमध्ये शासनाने स्थान द्यायला हवे होते. अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात जामीनच न मिळणे हा अन्याय दूर व्हायला हवा, तसेच गंभीर गुन्ह्यात पीडितांना लगेच नुकसानभरपाई देणे हे न्याय्य आहे, पण किरकोळ तक्रार झाली, तरी नुकसानभरपाई देण्याच्या तरतुदीने कायद्याचा गैरवापर वाढतो. हे रोखायला हवे. या सगळ्यांबाबत शासनाने काहीही केलेले नाही. - राजेंद्र कोंढारे, सरचिटणीस, अ.भा.मराठा महासंघ. उपविभागीय समित्या स्थापन करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. फक्त समित्या कागदावर राहता कामा नयेत, तसेच त्यावरील अशासकीय सदस्यांची नियुक्ती करताना, सत्तारूढ पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भरणा नसावा. प्रत्यक्ष दलित, आदिवासींमध्ये काम करणारे लोक असावेत. - कॉ. गणपत भिसे, परभणीतील आक्रोश मोर्चाचे नेते.