शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महागावात मोर्चावर पोलिसांचा लाठीमार

By admin | Updated: June 27, 2016 05:00 IST

विविध मागण्यांसाठी भाजपाचे आमदार राजेंद्र नजरधने यांच्या महागाव येथील कार्यालयावर रविवारी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला

महागाव (यवतमाळ) : पीक विम्यासह विविध मागण्यांसाठी भाजपाचे आमदार राजेंद्र नजरधने यांच्या महागाव येथील कार्यालयावर रविवारी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले. तर जमावातून भिरकावलेल्या दगडाने एक जण गंभीर जखमी झाले.तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर मोर्चा आमदार नजरधने यांच्या कार्यालयावर नाही, तर घरावर नेण्यासाठी काही जण आग्रही होते. त्याचवेळी नजरधने मोर्चाला सामोरे आले. त्यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांची भाषणे झाली. मात्र सेनेचा एक गट प्रमोद भरवाडे यांच्या नेतृत्वात घोषणा देत होता. हा मोर्चा आमदाराच्या कार्यालयावर पोहोचल्यावर तेथे गोंधळ सुरू झाला. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. मोर्चातील नागरिक सैरावैरा पळू लागले. या वेळी चेंगराचेंगरी होऊन काही जण जखमी झाले. पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना पांगविल्यानंतर प्रमोद भरवाडे यांच्यासह काही शिवसैनिकांना ताब्यात घेतले.मोर्चा आमदाराच्या कार्यालयावर ज्या वेळी पोहोचला त्या वेळी जमावातून एक दगड या कार्यालयाच्या दिशेने भिरकावला. त्यात भाजपाचे शहर अध्यक्ष सुरेश नरवाडे जखमी झाले. त्यांना पुसद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. (प्रतिनिधी)>सर्व सुरळीत असताना काही समाजकंटकांनी मला टार्गेट करून इतरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. मोर्चाला चेहरा नसतो, अशा वेळी पोलिसांनी काही निर्णय घेतला असेल तो प्रसंग पाहूनच घेतलेला निर्णय आहे. - राजेंद्र नजरधने, आमदार