शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

पानगावच्या हल्लेखोरांवर कडक कारवाई

By admin | Updated: February 26, 2016 01:57 IST

पानगावातील पोलीस कर्मचाऱ्यावरील हल्ला व्यक्तिगत नसून, तो पोलीस दलावरील हल्ला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर क्राईमकडून त्याचा तपास केला जाईल. दोषींवर कडक

हा रेल्वे अर्थसंकल्प ‘अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र’ असून, खान्देशला प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे. रेल्वेच्या पायाभूत विकासात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा मनोदय व्यक्त करून त्यांनी विकासाच्या कक्षा आणखी रुंदावल्या आहेत. ही घोषणा निश्चितपणे विकासाचे इंजिन म्हणून कार्य करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्रासाठीची तरतूद २०६ टक्क्यांनी वाढली असून, मराठवाडा आणि विदर्भालाही यातून मोठा वाटा मिळणार आहे. स्पेशल परपज व्हेईकलमध्येही महाराष्ट्राला मिळालेला वाटा मोठा आहे. राज्यातील अनेक रेल्वे उड्डाणपूल, अंडरब्रिज यांना मान्यता, अनेक नवीन रेल्वेमार्गांची कामे, नवीन मार्गांचे सर्वेक्षण यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती मिळेल आणि राज्यात रेल्वेचा समतोल विकास साधता येईल. एमयूटीपी-३ची मान्यता; तसेच चर्चगेट ते विरार आणि सीएसटी ते पनवेल या दोन उन्नत कॉरिडॉरच्या कामाला गती हे निर्णय मुंबईकरांचेसुद्धा प्रश्न सोडविणारे आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. रेल्वे अर्थसंकल्पाने संपूर्ण देशाची घोर निराशा केली आहे. पोकळ अर्थसंकल्प पाहता रेल्वेला प्रभूंच्या कर्तबगारीवर नव्हे, तर ‘प्रभू’कृपेवरच विसंबून राहावे लागेल. महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून मोठी अपेक्षा होती. पण राज्यातील प्रलंबित रेल्वे प्रकल्पांबाबत भरीव निर्णय झालेले नाहीत. - राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभायंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात ठोस उपाययोजना करण्याऐवजी शब्दांचा खेळ करून जुन्याच योजना नव्या रूपात मांडण्यात आल्या आहेत. त्यांचा पहिला अर्थसंकल्प दिशाहिन होता; आणि दुर्दैवाने दुसरा अर्थसंकल्पदेखील अपेक्षाभंग करणारा ठरला आहे. - खा. अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस भाडेवाढ टाळून प्रवाशांसाठीच्या सुविधांवर आणि रेल्वे सेवा सुधारण्यावर भर दिला आहे. रेल्वेमार्गालगत गोदाम उभारणे आणि त्याच्या वापरासाठी शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याचा प्रस्ताव आहे. पायाभूत सुविधा बळकट करून प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवून केलेल्या बजेटचे स्वागत करायला हवे. - खा. रावसाहेब दानवे पाटील, भाजपा प्रदेशाध्यक्षकरेंगे, देखेंगे, सोचेंगे प्रकारचा पूर्णपणे दिशाहीन अर्थसंकल्प असून, सुरेश प्रभू हे रेल्वेमंत्री नसून ‘हाउसकीपिंग मंत्री’ आहेत. भाडेवाढ केलेली नसली तरी अर्थसंकल्पाशिवाय वर्षभर कोणत्या ना कोणत्या छुप्या मार्गाने भाडेवाढ करण्याची भाजपा सरकारला सवय आहे. येत्या काळात रेल्वेचे आर्थिक गणित, पुढची दिशा काय असेल हे स्पष्ट होत नाही. - नवाब मलिक, प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेससर्वसामान्यांसाठी ‘सुपर फास्ट’ असा रेल्वे अर्थसंकल्प आहे. प्रवास भाड्यात कोणतीही वाढ न करून देशातील जनतेला प्रभू यांनी मोठा दिलासा दिला आहे. मुंबईकर आणि आसपासच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल आणि नजीकच्या काळात त्यांचा प्रवास अधिक सुखकर होईल.- विनोद तावडे, शिक्षणमंत्री मागील २-३ वर्षांचे आणि या वर्षीचे बजेट पाहता यात नवीन काहीच नाही. हे बजेट म्हणजे जुन्याच कढीला ऊत असून, फक्त वाय- फाय देणारे बजेट आहे. रेल्वेमंत्री राज्याचे असल्याने महाराष्ट्राला अपेक्षा होत्या; मात्र राज्याला दिलासा देणारी एकही मोठी बाब अर्थसंकल्पात नाही.- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषदवनपर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी बजेटमध्ये प्रस्तावित पॅकेज टूर यात्रेचे स्वागत आहे. यामुळे राज्यातील वन पर्यटनात भर पडेल. व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी एक संपूर्ण पॅकेज टूर यात्रा प्रस्तावित केली आहे. यामध्ये पेंच अभयारण्याचा त्यांनी समावेश केला आहे. - सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री, महाराष्ट्र राज्यरेल्वे कर्मचारी, तसेच प्रवासी ट्रॅक क्रॉस करताना जे मृत्यू होतात, त्यासाठी सुरक्षेचे उपाय करणार आहेत, हे स्वागतार्ह आहे, परंतु मध्यरेल्वेच्या मुख्य मार्गावरील प्रवाशांसाठी जास्त निधी-सुविधाही द्यायला हव्या होत्या. - खासदार श्रीकांत शिंदे, कल्याणशिफारशींना केराची टोपली फक्त भाडेवाढ नाही, हा मोठा दिलासा प्रवाशांना मिळाला आहे. सुरक्षिततेसाठी रेल्वे अर्थसंकल्पात भरीव तरतूद दिसत नाही. या वाढत्या मृत्यूने अस्वस्थ झालेल्या उच्च न्यायालयाने रेल्वेला फलाटांची उंची वाढवा, रुग्णसेवा पुरवा असे सूचवल्यावर रेल्वेला जाग आली. खासदारांच्या समितीने दिलेल्या शिफारशींचा उल्लेख अर्थसंकल्पात अपेक्षित होता.- खा. राजन विचारे, ठाणे‘ मी समाधानी’टिटवाळा-मुरबाडचे सर्वेक्षण होणार ही आनंदाची बाब आहे. रेल्वेमंत्र्यांनी राज्याला, ठाण्याला भरपूर दिले आहे. त्याबद्दल मी समाधानी आहे. टिटवळा-मुरबाड रेल्वे मार्गी लावून नगरपर्यंत नेण्यात येईल.- खा. कपिल पाटील, भिवंडी