शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना-भाजपा युतीमध्येही तणाव

By admin | Updated: August 29, 2014 03:44 IST

हरियाणा जनहित काँग्रेसने भाजपासोबतची आपली युती तोडली असतानाच महाराष्ट्रातही युती तोडण्याची मागणी शिवसैनिकांमध्ये जोर धरू लागली आहे. दिवसभर अनेक शिवसैनिकांमध्ये व्हॉटसअ‍ॅपवर याचीच चर्चा सुरू होती.

संदीप प्रधान, मुंबईहरियाणा जनहित काँग्रेसने भाजपासोबतची आपली युती तोडली असतानाच महाराष्ट्रातही युती तोडण्याची मागणी शिवसैनिकांमध्ये जोर धरू लागली आहे. दिवसभर अनेक शिवसैनिकांमध्ये व्हॉटसअ‍ॅपवर याचीच चर्चा सुरू होती. भाजपाची दादागिरी यापुढे क्षणभरही सहन न करता स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भाषा शिवसैनिक करीत होते.लोकसभा निवडणुकीतील विजयापासून भाजपा महाराष्ट्रात बिग ब्रदरच्या भूमिकेत जाऊ पाहात आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सूत्रे स्वीकारल्यापासून ते एकदाही मातोश्रीवर पायधूळ झाडायला गेले नाहीत व भविष्यातही जाणार नाहीत हे भाजपाचे नेते अभिमानाने खासगीत सांगतात. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेल्या १८ जागा हा केवळ मोदींच्या करिष्म्याचा चमत्कार आहे, असे भाजपा नेते खासगी गप्पांत बोेलतात. याची शिवसैनिकांना जाणीव आहे. जागावाटपाबाबत अलीकडे पुण्यात झालेल्या बैठकीत शिवसेनेला निमंत्रित केले नव्हते. योगायोगाने शिवसेना नेते दिवाकर रावते हे एका विवाह सोेहळ्याकरिता पुण्यात गेले होते. त्यामुळे त्यांना बळेबळे चर्चेत सहभागी करून घेण्यात आले. महायुतीमधील घटकपक्षांची जागावाटपाबाबत भाजपाशी चर्चा झाली आहे. मात्र शिवसेनेसोबत चर्चा झाली नसल्याचे घटकपक्षांचे नेते सांगतात. परिणामी शिवसेनेकडील जे मतदारसंघ घटकपक्षांना हवे ते सुटणार किंवा कसे याबाबत अनिश्चितता आहे. त्याचवेळी राज्यात युतीची सत्ता आल्यास सरकार हे भाजपाच्या नेतृत्वाखाली स्थापन झाले पाहिजे, असा निर्णय दिल्लीत भाजपाच्या वरिष्ठ वर्तुळात झाल्याचे गावागावातील भाजपा कार्यकर्ते सांगत फिरत असल्याने शिवसैनिक अस्वस्थ आहेत.शिवसैनिकांमधील ही अस्वस्थता नेतृत्वाने हेरली असून, राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वार्थाने मातब्बर नेत्यांना शिवसेनेत प्रवेश देण्याचा सपाटा लावला आहे. युती तुटली तर सर्वच्या सर्व २८८ मतदारसंघांत निवडणूक लढविताना समर्थ उमेदवारांची वानवा पडू नये, या दृष्टीने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.