शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
4
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
5
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
6
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
7
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
8
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
9
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
10
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
11
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
12
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
13
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
14
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
15
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
16
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
17
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
18
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
19
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
20
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!

बोपखेलमध्ये तणाव निवळला

By admin | Updated: May 24, 2015 00:27 IST

बोपखेल, रामनगर, गणेशनगर भागांतील दैनंदिन व्यवहार आज तिसऱ्या दिवशी पूर्वपदावर आले. दुकाने उघडी होती.

पिंपरी : बोपखेल, रामनगर, गणेशनगर भागांतील दैनंदिन व्यवहार आज तिसऱ्या दिवशी पूर्वपदावर आले. दुकाने उघडी होती. बस आणि रिक्षा प्रवाशी वाहतूक कायम होती. मात्र, तणाव काहीसा कायम होता. दोन दिवसांतील पोलिसांचा ताफा कमी झाला होता. त्यांची संख्या तुरळक झाली होती. सीएमईने आपल्या हद्दीतील रहदादारीचा रस्ता सर्वांसाठी त्वरित खुला करावा, या मागणीसाठी बोपखेलच्या रहिवाशांनी गुरुवारी आंदोलन केले. त्यास हिंसक वळण लागले. त्यात झालेल्या दगडफेक आणि लाठीमारात असंख्य नागरिक आणि पोलीस जखमी झाले. अनेकांची धरपकड करीत पोलिसांनी अनेकांना अटक केली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या लाठीमारामुळे नागरिकांनी काल शुक्रवारी बंद पाळला होता. त्यामुळे सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. परिसरात प्रचंड तणाव होता. नागरिकांअभावी रस्ते ओस पडले होते. चौकाचौकांत असलेला मोठा पोलीस फाटा आज काढून घेण्यात आला होता. बापुजीबुबा चौकात, तसेच प्रवेशद्वाराच्या आतमध्ये पोलीस पथक तैनात होते. त्यात महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या अधिक दिसत होती. प्रवेशद्वाराच्या आतमध्ये दंगल नियंत्रक वाहन आणि व्हॅन होती. पोलीस कोठडीत एका दिवसाने वाढ भोसरी पोलिसांनी १०० पुरुष आणि ७१ महिलांना अटक केली. त्यांतील १८ जणांना पोलीस कोठडी शनिवारी संपली. त्यांना आज खडकी न्यायालयात हजर केले असता, त्यांना सोमवारपर्यंत कोठडी देण्यात आली. यामध्ये श्रीरंग धोदाडे, गुलाब भालेराव, अमित घुले, रोहन घुले, विकास गोगावले, अमर वाल्मीकी, रवींद्र घुले, दत्तात्रय घुले, प्रभाकर सरवदे, चेतन देवकर, बाबू राठोड, सुमीत कदम, दीपक घुले, इसान शेख, श्याम मेवाती, संदीप चौगुले, राहुल धुसिया, निखिल घुले यांचा समावेश आहे, अशी माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी दिली. बांगर यांना वगळता उपचारानंतर सोडण्यात आले आहे. यातील बहुतेक जण पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहेत. दरम्यान, याप्रकरणी ग्रामस्थांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.(प्रतिनिधी)काही ठिकाणी तणाव४आज तिसऱ्या दिवशी मात्र जनजीवन पूर्वपदावर आले. रहिवाशांनी आपले दैनंदिन व्यवहार सुरू केले. दुकाने उघडण्यात आली होती. त्यामुळे गरजेच्या वस्तू आणि किराणा साहित्याची खरेदी केली गेली. मात्र, रस्त्यावर नागरिकांची ये-जा करण्याचे प्रमाण वाढले होते. पीएमपी बस वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीत होती. दापोडीहून येता येत नसले, तरी येथून रिक्षा प्रवासी वाहतूक विनाअडथळा सुरू होती. भोसरी व विश्रांतवाडी मार्गावरून नागरिकांनी भरलेल्या रिक्षा गावातील बापुजीबुवा चौकापर्यंत येत होत्या. बोपखेल गावठाण परिसरात मात्र तणाव जाणवत होता. असंतोष खदखदत असल्याचे काही नागरिकांनी सांगितले.जखमी पोलीस कर्तव्यावर ४दगडफेकीत जखमी झालेले पोलीस तिसऱ्या दिवशीही बंदोबस्तात होते. आपली जखम विसरून ते कर्तव्यासाठी उन्हात उभे राहून सेवा बजावत होते. पायाला दुखापत झाल्याने काही कर्मचारी एका पायाने लंगडत ये-जा करताना दिसत होते. रस्ता खुला करण्याची मागणी सीएमई हद्दीतील बोपखेल ते दापोडी हा रस्ता मानवतेच्या दृष्टिकोनातून खुला करण्याची मागणी कॉँग्रेसच्या मानवाधिकार विभागाचे प्रदेश कार्यकारी अधिकारी मॅन्युअल डिसुजा यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गावकऱ्यांच्या प्राथमिक व अत्यावश्यक सेवांबाबत संवेदनशीलपणे विचार करावा. शाळा आणि महाविद्यालयांचे विद्यार्थी, वैद्यकीय सेवा घेण्यासाठी वाहतूक व्यवस्था, बाजारपेठेसाठी पिंपरी-चिंचवड शहरात ये-जा करत असल्याने हा रस्ता खुला असावा. या संदर्भात योग्य तोडगा काढून भूमिपुत्रांना पूर्वीप्रमाणे रस्ता खुला करावा, अशी मागणी डिसुजा यांनी राव यांच्याकडे केली आहे.