शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

दहीहंडीचे थर २० फुटांपर्यंतच

By admin | Updated: November 6, 2014 04:10 IST

दहीहंडीत २० फुटांपेक्षा अधिक थर नसावेत, यासह उच्च न्यायालयाने या उत्सवावार घातलेले विविध निर्बंध सर्वोच्च न्यायालयानेही कायम केले आहेत़

मुंबई : दहीहंडीत २० फुटांपेक्षा अधिक थर नसावेत, यासह उच्च न्यायालयाने या उत्सवावार घातलेले विविध निर्बंध सर्वोच्च न्यायालयानेही कायम केले आहेत़ त्यामुळे उंच थरांची स्पर्धा लावणाऱ्या आयोजकांना व मंडळांना चांगलीच चपराक लागली आहे़सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात याविषयी दाखल झालेली विशेष अनुमती याचिका निकाली काढली़ त्यात न्या़ अनिल दवे यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाने घातलेले निर्बंध स्थगित केल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आॅगस्टमधील आदेश सविस्तर नमूद केले व त्यापुढे आता ही याचिका निरर्थक ठरत असल्याचे स्पष्ट करीत संबंधित याचिका निकाली काढली़ याने उच्च न्यायालयाचे आदेश कायम झाले की फेटाळण्यात आले, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता़ अखेर यासंदर्भात उच्च न्यायालयातील सरकारी वकील संदीप शिंदे यांच्याशी मंगळवारी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल संभ्रम निर्माण करणारा असून तेथील सरकारी वकिलाला याबाबत न्यायालयाकडून खुलासा करण्यास सांगितले जाईल़ मात्र सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचे आदेश कायम केले असून बालहक्क आयोगाने दहीहंडीसाठी सुचवलेली बाल वयोमर्यादा रीतसर अध्यादेश जारी करून जाहीर करावी, असे सर्वोच्च न्यायालाचा निकाल सांगत असल्याचे अ‍ॅड़ शिंदे यांनी बुधवारी स्पष्ट केले़ त्यामुळे पुढच्या वर्षी दहीहंडी उत्सवात उंच थर लागणार नाहीत़ दहीहंडीविरोधात फौजदारी जनहित याचिका चेंबूरमधील सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी अ‍ॅड़ नितीन नेवसे यांच्यामार्फत केली होती़ त्याची दखल घेत न्यायालयाने १८ वर्षांखालील मुलांना गोविंदा पथकात सहभागी करून घेण्यासाठी व २० फुटांच्या वर थरांना मनाई केली होती़ याविरोधात अमित सरैया व विशाल शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका केली होती़ (प्रतिनिधी)